१९९५ मध्ये जन्मलेल्या जया वयाच्या 7 व्या वर्षापासून अध्यात्मात गुंतल्या होत्या आणि दीक्षा घेतल्यानंतर त्यांचे नाव जया शर्मावरून बदलून जया किशोरी ठेवण्यात आले होते. त्यांनी लहान वयातच ‘नानी बाई रो मायरा’ आणि ‘श्री मद भागवत कथा’ करायला सुरुवात केली.
दुसरीकडे, किशोरी जी अनेकदा तिचे प्रेरक व्हिडीओ चाहत्यांसह शेअर करताना दिसतात, ज्यामध्ये त्या लोकांना नवीन धडे देतात. नुकताच जया किशोरीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये किशोरी सांगत आहेत की, जर तुमची कोणाशी भांडण झाली असेल आणि त्याने तुम्हाला रागाच्या भरात काही बोलले असतील, तर ते त्यावेळी कडू लागतं. त्यावेळी आपल्याया त्याचे खूप वाईट वाटते आणि आपण लगेचच रागाच्या भरात त्या व्यक्तीसोबतचं नातं संपवतो. काही काळानंतर आपल्याला कळतं की भांडण इतकं मोठं नव्हतं की त्यामुळे नातं संपुष्टात आलं. पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. त्यामुळे रागाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. कोणतीही कृती करण्यापूर्वी शंभर वेळा विचार करा. त्याचा काय परिणाम होईल.
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : Holi 2022 : होळीमध्ये मुलींबरोबरच मुलांनी सुद्धा रंग खेळण्यापूर्वी हे उपाय करावेत
जया किशोरीच्या या व्हिडीओला आतापर्यंत हजारो लोकांनी लाईक केलं आहे. किशोरीजींच्या या व्हिडीओवर लोक त्यांच्या प्रतिक्रियाही देत आहेत.
जया किशोरीच्या कथा ऐकण्यासाठी मोठा जनसमुदाय जमतो. बहुतेक लोकांना त्यांची ७ दिवसांची श्रीमद भागवत कथा आणि ३ दिवसांची नानीबाई रो मायरा कथा ऐकायला आवडते. किशोरीजींनी आत्तापर्यंत ३५० हून अधिक प्रवचने दिली आहेत.