वय लहान असताना आपल्या केसांची वाढ, जाडी सर्वांत उत्तम होती; केस गळायचे किंवा तुटण्याचे प्रमाणही कमी असायचे. मात्र, जसजसे आपले वय वाढत जाते, तसतसे केस पांढरे होणे, गळणे, तुटणे, पातळ होणे यांसारख्या समस्या निर्माण होऊ लागतात. त्याची अनेक कारणे असू शकतात. मात्र सर्वांत सामान्य; परंतु तितकेच महत्त्वाचे कारण म्हणजे केसांना तेल न लावणे हे असू शकते. शाळेत असताना आपण केस धुण्याच्या वेळा प्रामाणिकपणे पाळायचो, डोक्याला दररोज तेलाने मालिश करायचो. मात्र, आता मोठ्या प्रमाणात रासायनिक घटक असणारे शाम्पू, सिरम, हेअर मास्क यांसारखी उत्पादने वापरण्याचे प्रमाण वाढलेले असून, केसांना तेल लावण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

विशेषतः तरुणांमध्ये केसांच्या समस्या अधिक प्रमाणात निर्माण होत असतात. तेल लावल्याने केस अतिशय चिकट होतात किंवा ते तेलकट दिसतात. त्यामुळे बहुतांश तरुण व्यक्तींकडून दररोज तेल लावणे टाळले जाते. परिणामी कोंडा, केस आणि डोक्यावरची त्वचा कोरडी होणे, खाज सुटणे, केस लवकर पांढरे होणे यांसारख्या सामान्य गोष्टींचा त्रास सहन करावा लागतो. मात्र, तुम्हाला जर पुन्हा घनदाट, लांबसडक, चमकदार केस हवे असतील, तर या चार तेलांचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो. दररोज नाही; परंतु किमान काही दिवसांमधून एकदा आपल्या डोक्याला, केसांना आणि त्यांच्या मुळाशी या चार तेलांचा वापर केलात, तर तुमच्या केसांची वाढ होऊन ते अतिशय सुंदर दिसू शकतात, अशी माहिती एनडीटीव्ही इंडियाच्या [NDTV India] एका लेखामधून मिळाली आहे.

Five detox tips for rejuvenate your body
Post Diwali Detox Tips : सणासुदीला भरपूर गोड, तेलकट पदार्थ खाल्ले का? मग शरीर डिटॉक्स करण्यासाठी करून पाहा हे पाच उपाय
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
dudhi barfi recipe
अवघ्या काही मिनिटांत बनवा दुधी भोपळ्याची पौष्टिक बर्फी; वाचा साहित्य आणि कृती…
Cucumber raita recipe
बुंदी रायता नेहमीच खाता, यावेळी ट्राय करा काकडी रायता; पटकन वाचा साहित्य आणि कृती
Arjun Kapoor confirming breakup with Malaika Arora and told about importance of emotional freedom
मलायका अरोराबरोबर ब्रेकअपनंतर अर्जुन कपूरने सांगितले, भावनिक स्वातंत्र्य का महत्त्वाचे? जाणून घ्या, तज्ज्ञ याविषयी काय सांगतात
Pankaj Tripathi shares recipe for his ‘special’ masala chai
पंकज त्रिपाठी मसाला चहामध्ये टाकतात तमालपत्र! चहामध्ये तमालपत्र घालावे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या फायदे
Sweet or savoury breakfast
सकाळच्या नाश्त्यामध्ये गोड पदार्थ खावे का? त्याचा आरोग्यावर काय होतो परिणाम? तज्ज्ञांकडून घ्या जाणून…
Common lifting mistakes and how to avoid them
Lifting Heavy Objects Tips : जड वस्तू उचलताना तुम्हीसुद्धा श्वास रोखून ठेवता का? मग थांबा! डॉक्टरांचा हा सल्ला वाचा

हेही वाचा : केस गळतायत.. वजन वाढतेय.. काय करायचे म्हणून प्रश्न पडलाय? आहारात भर घाला फक्त ‘या’ पदार्थाची….

केसांसाठी उपयुक्त चार तेल

१. रोजमेरी तेल

रोजमेरी तेल किंवा रोजमेरीची पाने आपल्या केसांसाठी अत्यंत उपयुक्त असतात. ही पाने पाण्यात उकळून थंड झाल्यावर ते पाणी डोक्यावर लावल्याने केसांची वाढ होण्यास मदत होते. रोजमेरीमध्ये अँटीइन्फ्लेमेटरी घटक असून, अ, क व बी ६ ही जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे याच्या तेलाचा वापर केल्यास केसांची वाढ होऊन, ते घनदाट होण्यास मदत होते.

२. आर्गन तेल

आर्गन तेलामध्ये अ, क व इ या जीवनसत्त्वांचे प्रमाण जास्त असते. त्याचबरोबर अँटिऑक्सिडंट्स व ओमेगा ६ हे फॅटी अॅसिडदेखील उपलब्ध असते. या तेलाचा वापर केल्यास केसांचे गळणे कमी होते; परिणामी केस जाड होतात. तसेच डोक्यावरील त्वचा मऊ होऊन, कोंडा नाहीसा होण्यास मदत होते.

३. कांद्याचे तेल

कांद्याचे तेल आपले केस, तसेच डोक्याच्या त्वचेसाठी खूप गुणकारी असते. या तेलामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात; जे आपल्या डोक्याच्या त्वचेची काळजी घेतात. तसेच ते त्वचेवरील इन्फेक्शन्स / त्रासांपासून काळजी घेण्याचे कामही करते. कांद्याचे तेल घरी बनवता येऊ शकते. त्यासाठी खोबरेल तेलामध्ये कांद्याचे तुकडे घालून तेल उकळून घ्या. कांद्याचा रंग बदलल्यानंतर गॅस बंद करा आणि गाळणीच्या साह्याने तेल गाळून घ्या. बघा तयार आहे तुमचे घरगुती कांद्याचे तेल.

हेही वाचा : हिवाळ्यात केसांना कोंड्यापासून ठेवा दूर! केसांची काळजी घेण्यासाठी पाहा ‘हे’ पाच सोपे घरगुती उपाय….

४. बदामाचे तेल

बदामाचे तेल आपले केस तुटणे, गळणे या तक्रारी थांबवते. तसेच ते डोक्यावरील त्वचेला मऊपणा देण्याचे काम करते. याबाबतचा उत्तम फायदा होण्यासाठी अंघोळीआधी किमान एक तास बदामाचे तेल हलकेसे कोमट करून [गरम नाही] आपल्या केसांच्या मुळापासून ते शेवटी टोकापर्यंत लावून ठेवावे. मग अंघोळीदरम्यान केस स्वच्छ धुऊन घ्या. पाहा केस घनदाट, मऊ व चमकदार होण्यास मदत होईल.

[टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित असल्याने कृपया यास वैद्यकीय सल्ला समजू नये.]