भारतातील तरुण सर्व गोष्टींमध्ये बरेच प्रभावी आहेत, त्यांच्याकडे जीवन, जीवनशैली आणि गुंतवणूकी विषयी अधिक गंभीर दृष्टीकोन असतो. आकडेवारीनुसार, तरुण वर्ग भारतीय लोकसंख्येचा एक मोठा भाग आहे. ही पिढी तंत्रज्ञानाबरोबर वाढली आहे. स्वत:चे घर खरेदी करण्याची गरज सर्व वयोगटासाठी नेहमीच प्राधान्य असते. स्वत:चे घर खरेदी करण्याचे स्वप्न साध्य करणे मागच्या काही वर्षांमध्ये गृह कर्जाच्या उपलब्धतेमुळे सोपे झाले आहे. वाढते उत्पन्न हे त्यामागील एक कारण आहे. एका सर्वेक्षणानुसार तरुण (२५ वर्षे ते ३५ वर्षे) घर खरेदी करण्याला सर्वात मोठे स्वप्न मानतात. आपल्याला परवडणाऱ्या दरात आधुनिक सुविधांसहित सुसज्ज अशा घरांना ग्राहक पसंती देतात. विशेषतः पहिले घर खरेदी करताना काही स्मार्ट टीप्सचा वापर व्हायला हवा. पॅराडिगम रिअल्टीचे व्यवस्थापकीय संचालक पार्थ मेहता यांनी या टीप्स दिल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रेरा नोंदणीकृत विकासक- विकासक रेरा अंतर्गत नोंदणीकृत असणे आवश्यक आहे, तेथे काही अनिवार्य खुलासे आहेत जी विकसकाने त्यांच्या वेबसाइटवर करणे आवश्यक आहे. प्रकल्पाबद्दलची माहिती जसे स्थान, किंमत, मंजूरीची अधिकृत कॉपी आणि प्रारंभाच्या विविध तपशील, प्रमोटर्स इत्यादी. संभाव्य खरेदीदार नेहमी अशा विकासकांकडे जातात जे वेळेवर प्रकल्पाचे वितरण करतात. त्यामुळे प्रकल्प वितरणात अधिक विलंब झाल्यामुळे गुंतवणुकीच्या कालावधीत अडथळे निर्माण होऊ नये याची खात्री देतात.

अपार्टमेंटचा आकार : सामान्यतः कार्पेट क्षेत्राचा उल्लेख नसतो, बिल्डर्स बहुतेक वेळा सुपर बिल्ड-अप क्षेत्राचा उल्लेख करतात ज्यामध्ये पायऱ्या, लॉबी, इत्यादीसारख्या सामान्य क्षेत्रांचा समावेश असतो. तर फ्लॅटचे कार्पेट क्षेत्र सुपर बिल्ड-अप क्षेत्रापेक्षा २५ ते ३० टक्के कमी असते. म्हणून, फ्लॅटचे कार्पेट क्षेत्र अर्थात भिंतीच्या आत असलेले क्षेत्र तपासणे नेहमीच गरजेचे आहे.

भूतकाळातील रेकॉर्ड : आपण ज्या विकासकाकडून मालमत्ता खरेदी करत आहात, त्यांनी मागील ग्राहकांना वितरित करण्याच्या खोटी कागदपत्रे दिली नाहीत ना याची खात्री करा. प्रकल्पांचे वेळेवर वितरण आणि विकासकाची पार्श्वभूमी खरेदीदारांच्या यादीत असावी.

गहाणखत पर्याय : आपल्या इतर आर्थिक उद्दीष्टांना त्रस्त करणारी कोणतीही आर्थिक ओझे टाळण्यासाठी गहाण पर्याय आणि पेमेंट योजनांची पूर्ण तपासणी करणे महत्त्वाचे आहे. सध्याच्या बाजारातील परिस्थितीत रिअल इस्टेट सेक्टर खरेदीदारांप्रती पक्षपाती आहे. त्यामुळे बहुतेक विकासक त्यांच्या वर्तमान यादीचा भार कमी करण्यासाठी आकर्षक आणि सुलभ पेमेंट पर्याय घेऊन येतात. तथापि, कर्ज सहजपणे मिळविण्यासाठी उच्च क्रेडिट स्कोअर राखणे महत्वाचे आहे.

सल्लागार/वकील नियुक्त करा : सर्व कंत्राट, करार आणि इतर तपशीलांविषयी योग्य कल्पना मिळवण्यासाठी त्यांचे सल्लागाराकडून सत्यापन करून घेणे चांगले आहे. दीर्घकालीन सुरक्षिततेसाठी, खासकरुन मोठ्या प्रमाणात पैशांची गुंतवणूक करताना कागदपत्रांबद्दल संपूर्ण तपशील असणे फार महत्वाचे आहे.

भविष्यातील खर्च : देखभालीचा खर्च विचारात घ्यावा. बाकीच्या तुलनेत हिरव्या इमारतींची किंमत अधिक आहे. ते बिलवर भरपूर ऊर्जा बचत देतात. गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व पर्यायांवर नीट विचार करा.

परिसर/ सामाजिक पायाभूत सुविधा : मालमत्तेमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी आपण क्षेत्राचे निरीक्षण करणे मात्र विसरू नका. सार्वजनिक उद्यान, वाहतूक सुविधा, हॉस्पिटल, शॉपिंग मॉल, मूव्ही थिएटर, सुपर मार्केट, रेस्टॉरंट्स इ.ची खात्री करुन घ्या. आपण अशा क्षेत्रात गुंतवणूक करावी जेथे शाळा, रुग्णालये सारखे विकास केले जात आहेत किंवा योजनाबद्ध आहेत.