सध्या फॅशनचे वेगवेगळे ट्रेंड पाहायला मिळत आहेत. त्यातीलच एक म्हणजे कलर लेन्स वापरणे. डोळे अधिक आकर्षक दिसावेत यासाठी अनेक जण कलर लेन्स वापरतात. काही जण एखाद्या विशेष प्रसंगासाठी याची निवड करतात, तर काही जण अगदी रोज कलर लेन्स वापरतात. पण कलर लेन्स निवडताना तुमच्या त्वचेचा रंग, डोळ्यांचे आरोग्य अशा गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे असते. अशा काही गोष्टी लक्षात ठेऊन कलर लेन्स निवडल्यास ते सौंदर्यात भर पाडतील.
डोळ्यांसाठी कलर लेन्स निवडताना लक्षात ठेवा या गोष्टी
त्वचेच्या रंगाप्रमाणे करा निवड
प्रत्येक व्यक्तीच्या त्वचेचा रंग म्हणजेच स्किन टोन हा वेगळा असतो. वॉर्म, लाईट असे स्किन टोनचे प्रकार आहेत. त्यामुळे त्वचेच्या रंगाप्रमाणे कलर लेन्स निवडावी. कधी कधी फक्त ड्रेसच्या रंगानुसार जर कलर लेन्स निवडली तर तुमचा लूक खराब होण्याची शक्यता असते.
Hair Care Tips : तुम्हीही रात्रभर डोक्याला तेल लावून ठेवता का? जाणून घ्या याचे दुष्परिणाम
डोळ्यांचा आकार लक्षात घ्या
कलर लेन्स वेगवेगळ्या आकारात उपलब्ध असतात. त्यामुळे लेन्स विकत घेताना डोळ्यांचा आकार लक्षात ठेवा. जेणेकरून लेन्स घातल्यानंतर डोळ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. कधी कधी योग्य मापाचे लेन्स नसल्यास डोळ्यांना इन्फेक्शन देखील होऊ शकते.
ऑनलाईन लेन्स विकत घेणे टाळा
अनेक वस्तू ऑनलाईन स्वस्त दरात मिळतात. परंतु लेन्स ऑनलाईन खरेदी न करण्याचा सल्ला दिला जातो. लेन्स विकत घेताना डोळ्यांचा आकार ही मुख्य गोष्ट असते, त्यामुळे ऑनलाईन खरेदी करताना कोणत्या आकाराचे लेन्स घ्यायचे यामध्ये अडचण येऊ शकते. यासाठी आधी तुम्ही तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. त्यांच्या सल्ल्यानुसार तुम्हाला योग्य लेन्स निवडता येईल.
ब्रँडेड लेन्स निवडा
कलर लेन्समध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यातील काही स्वस्त किंमतीमध्ये देखील मिळतात. परंतु डोळ्यांचे आरोग्याबाबत विचार करून नेहमी ब्रँडेड लेन्सची निवड करावी असा सल्ला दिला जातो.
Skin Care Tips : टॅनिंगमुळे चेहरा निस्तेज झालाय? तर ‘हे’ घरगुती उपाय वापरुन पाहाच
इतरांचे लेन्स वापरू नये
कधीही इतरांचे लेन्स वापरू नये किंवा आपले लेन्स इतर कोणाला वापरायला देऊ नये. कारण यामुळे डोळ्यात इन्फेकशन होण्याची भीती असते. अशाप्रकारे लेन्स निवडताना काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच तुमच्या डोळ्यांसाठी कोणते लेन्स योग्य आहेत यासाठी तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.