दिवाळी असो वा दुसरा कुठला सणसमारंभ, आपल्या केसांना वेगळ्या पद्धतीने बांधून त्याची सुंदर केशरचना केल्याशिवाय आपला ‘लूक’ पूर्ण होऊच शकत नाही. अशा केसांची सुंदर रचना करण्यासाठी तुमचे केस कुरळे, सरळ, लांब अश्या कुठल्याही प्रकारचे असले तरीही त्यांची काळजी घेण्याचे आणि त्यांना चमकदार बनवण्याचे अनेक पर्याय असतात. तर यंदाच्या दिवाळी, भाऊबीजेसाठी केसांची विशेष काळजी घेतलीत, तर कोणतीही सुंदर हेअरस्टाईल करून तुम्ही सगळ्यांमध्ये उठून दिसू शकता.

“सणासुदीच्या काळात कोणतीही केशरचना करण्याआधी, केसांचे स्वास्थ्य कसे आहे हे बघणं फार महत्त्वाचे असते. केसांचे आरोग्य जर उत्तम असेल, तर अगदी सहजपणे त्यांची वेगवेगळ्या प्रकारची रचना करू शकता.
यासाठी केसांना आधी तेलाने मालिश करून आणि व्यवस्थित कंडिशनिंग करून त्यांना योग्य ते पोषण द्यायला हवे. असे केल्याने, तुमच्या केसांचा रुक्षपणा जाऊन केस मऊ मुलायम होतात. त्यांना चमक येऊन ते सांभाळण्यासदेखील सोपे होतात.” असे गोदरेज प्रोफेशनलचे, नॅशनल टेक्निकल हेड [National Technical Head at Godrej Professional] शैलेश मुल्या [Shailesh Moolya] यांनी हिंदुस्थान टाइम्सच्या लाइफस्टाइल इंटरव्ह्यूमध्ये सांगितले आहे.

Rubina Dilaik Fitness Secret
Rubina Dilaik : अभिनेत्री रुबिना दिलैक पिते ताजा टोमॅटोचा ज्यूस; तज्ज्ञांनी सांगितले याचे फायदे
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Jaggery on empty stomach
थंडीच्या दिवसात सकाळी उठल्यावर सर्वात आधी कोणत्या पदार्थांचे सेवन करायला हवे?
Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
Mooli ka raita recipe how to make muli ka raita mulyachi koshimbir recipe in marathi
हिवाळ्यात हा चटकदार पदार्थ खायलाच हवा, जेवण होईल चवदार; मुळ्याचे रायते कसे करायचे जाणून घ्या
Make Kabuli Chana Kebabs in just a few minutes
अवघ्या काही मिनिटांत बनवा काबुली चन्याचे कबाब; वाचा साहित्य आणि कृती
Dragon fruit benefits for skin and hair
त्वचा आणि केसांसाठी ड्रॅगन फ्रूट फायदेशीर; जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत आणि वेळ
Government Nursing Training School , Bhandara ,
भंडारा : गुण वाढवण्यासाठी प्राचार्यांनी विद्यार्थिनींकडे केली शरीरसुखाची मागणी

हेही वाचा : वाया गेलेले ‘हे’ पदार्थ ठेवतील घर सुगंधी; पहा काय आहेत या घरगुती टिप्स अन् ट्रिक्स. .

यासोबतच, केसांच्या आरोग्यासाठी जर तुम्ही चांगल्या प्रतीच्या उत्पादनांचा वापर केलात, तर केस सुदृढ होण्यास मदत होते. त्याचसोबत केसांवर जर कुठल्याही गरम साधनांचा [हेअर स्ट्रेटनर, कर्ललर] वापर करणार असाल तर ती साधनं वापरण्याआधी केसांना उष्णतेपासून वाचवणाऱ्या स्प्रेचा वापर अवश्य करावा, असे देखील त्यांनी सांगितले.

“केसाच्या टोकाशी, केसांना जर दोन तोंडं [split ends] आली असतील तर त्याने केसांची चमक जाते, ज्यामुळे केस निर्जीव दिसतात. अशावेळेस कोणत्याही खास कार्यक्रमाआधी केस थोडे कापून त्यांना व्यवस्थित आकार दिल्याने ते सुंदर दिसतात. तुम्ही अगदी एक दोन इंच केस जरी कापलेत, तरी त्यानेही तुमच्या व्यक्तिमत्वावर चांगला परिणाम होतो आणि तुम्ही सर्वांमध्ये उठून दिसता”, असं सेलिब्रेटी हेअरड्रेसर [Celebrity Hairdresser] आणि बटरफ्लाय पॉन्ड सलूनच्या मालक [Butterfly Pond Salon] सिल्व्हिया चॅन [Sylvia Chen] यांचं म्हणणं आहे.

केसांसोबत सतत काहीतरी वेगळं करत राहिलं पाहिजे. याने तुमच्या केसांचं सौंदर्य खुलून येणास मदत होते. “केसांना विविध प्रकारचे चाप, पिना लावल्याने; फुलांची, खड्यांची किंवा साधी नक्षी असलेली वेगवेगळी हेअरबँड्स, रबर लावल्यानेदेखील केस सुंदर दिसण्यास मदत होते. त्यामुळे तुम्ही घातलेल्या कपड्यांनुसार केसांना वेगवेगळ्या प्रकारे सजवण्याचा प्रयत्न करा”, असंदेखील त्या म्हणतात.

Story img Loader