Tips And Tricks To Keep Your Hands And Feet Warm : हिवाळ्याचा हंगाम सुरू झाला की, हात-पाय उबदार ठेवणे खूप गरजेचे वाटते. शरीराच्या या भागांना प्रथम थंडी जाणवू लागते, म्हणूनच शरीराच्या या अवयवांना उबदार ठेवणेच अनेकदा आव्हानात्मक ठरते (Keep Your Hands And Feet Warm). हिवाळ्यात पाय उबदार ठेवण्यासाठी लोक रात्री मोजे घालतात, पायांवर जाड चादर किंवा गोधडी घेऊन झोपून जातात. पण, फक्त एवढंच करणं पुरेसं आहे का? तर नाही…

तर आज आपण या लेखातून थंडीत हात आणि पाय कसे उबदार ठेवायचे याच्या काही टिप्स पाहणार आहोत (Keep Your Hands And Feet Warm)…

१. योग्य कपडे घाला

how to get rid of shoe smell instantly
तुमच्या शूजमधून येणारी दुर्गंधी काही मिनिटांत होईल गायब, फॉलो करा फक्त ‘या’ ५ सोप्या टिप्स
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
How to make paratha
प्रत्येक वेळी पराठे लाटताना फुटतात? मग ट्राय करून बघा ‘या’ टिप्स…
Dog Winter Clothes
तुमच्या पाळीव प्राण्याला थंडीचा सामना करण्यासाठी स्वेटर घालणे गरजेचे आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांची मते…
winter kitchen tips 5 time saving breakfast hacks
Winter Kitchen Tips : हिवाळ्यात नाश्ता बनवताना आळस येतोय? मग वापरा ‘या’ ५ स्मार्ट कुकिंग टिप्स
way of chopping and cleaning methi leaves
मेथीची भाजी खायला आवडते; पण साफ करायचा कंटाळा येतो? मग ‘या’ सोप्या टिप्सच्या मदतीने भाजी चुटकीसरशी करा साफ
These simple tips will help to make a delicious food
जेवण बनवताना खूप धावपळ होते? ‘या’ सोप्या टिप्स रूचकर जेवण बनवण्यासाठी करतील मदत
Groom dance on marathi song
VIDEO: “आयुष्य खूप सुंदर आहे फक्त नवरा हौशी पाहिजे” मारवाडी नवरदेवानं बायकोसाठी मराठी गाण्यावर केला खतरनाक डान्स

हिवाळ्यात स्वतःला उबदार ठेवण्याची गुरुकिल्ली म्हणजे व्यवस्थित कपडे घालणे. आपण घरी असलो तरीही पातळ, मॉइश्चर वाढवणारे हातमोजे, टी-शर्ट, पायात थर्मल मोजे आणि लोकरीचे शूज घाला. तुमचे शरीर उबदार ठेवल्याने तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण राखण्यास मदत होते.

२. ॲक्टिव्ह रहा

ॲक्टिव्ह राहिल्याने रक्त परिसंचरण सुधारते, जे नैसर्गिकरित्या तुमचे अंग गरम ठेवते. चालणे, धावणे यांसारखे हलके व्यायामदेखील तुमच्या हात आणि पायांमध्ये रक्त प्रवाह वाढवू शकतात. चालणे, जॉगिंग किंवा स्ट्रेचिंग केल्याने रक्त प्रवाह उत्तेजित होण्यास मदत होते. थंडीत तुमचे हात आणि पाय गरम राहण्यासाठी तुमच्या मुठी क्लँचिंग आणि अनक्लेंच करणे यासारखे हलके व्यायाम करून पाहा.

३. घट्ट कपडे आणि ॲक्सेसरीज घालणे टाळा

हात-पाय उबदार ठेवण्यासाठी घट्ट हातमोजे, मोजे किंवा कपडे घालू नका. यामुळे रक्ताभिसरणात अडथळा येऊ शकतो. असे कपडे निवडा, जे शरीराच्या अवयवांवर व्यवस्थित बसतील. पण, रक्त प्रवाह आणि इन्सुलेशनसाठी अडथळा निर्माण करणार नाहीत.

हेही वाचा…Tan Removal Remedy : चमकदार त्वचेसाठी घरच्या घरी करा उपाय! दही व कॉफीचा लावा मास्क; पण डॉक्टरांचे मत काय?

४. गरम पाण्याची बाटली

हिवाळ्यात हात-पाय उबदार राहण्यासाठी गरम पाण्याच्या बाटल्या स्वतःजवळ घेऊन झोपणे हा एक चांगला उपाय आहे, ज्याची चाचणी सुद्धा करण्यात आलेला आहे. बसताना किंवा झोपताना आपल्या पायाजवळ गरम पाण्याची बाटली ठेवून, आपण सर्दीपासून बचाव करण्यासाठी त्वरीत आरामदायक वातावरण तयार करू शकतो. आपले हात-पाय गरम ठेवण्यासाठी गरम पाण्याची बाटली मऊ कव्हर किंवा टॉवेलमध्ये गुंडाळा (Keep Your Hands And Feet Warm).

५. पेय प्या

आले, दालचिनी, हळद यांसारख्या नैसर्गिक घटकांसह बनविलेली गरम पेये तुम्हाला आतून उबदार ठेवण्यास मदत करू शकतात. हे मसाले उष्णता निर्माण करणाऱ्या गुणधर्मांसाठी ओळखले जातात, जे रक्त परिसंचरण वाढवतात आणि हिवाळ्यात तुमचे शरीराला आरामदायी ठेवतात. झोपायच्या आधी एक गरम कप हर्बल चहा किंवा मसालेदार दूध तुमच्या शरीराचे तापमान कायम राखत नाही तर तुम्हाला आराम देण्यास सुद्धा मदत करते, ज्यामुळे रात्री चांगली झोप लागते.

६. हात आणि पायांचा मसाज करा

थंडीच्या दिवसात हात आणि पायांना मसाज करणे, त्यांना उबदार ठेवण्याचा एक सोपा पण प्रभावी मार्ग आहे. नियमित तेल मालिशने रक्ताभिसरण उत्तेजित करते. हे सुधारित रक्ताभिसरण केवळ उष्णता टिकवून ठेवण्यास मदत करत नाही तर थंड हंगामात उद्भवू शकणारी सुन्नता आणि अस्वस्थतादेखील प्रतिबंधित करते.

तुम्ही वॉर्मिंग लोशन किंवा मेन्थॉल, निलगिरी किंवा दालचिनीसारखे घटक असलेले तेल वापरू शकता, जे उबदारपणाची भावना वाढवतात (Keep Your Hands And Feet Warm). तुमचे तळवे किंवा पायांना लोशन किंवा तेल लावा आणि हलक्या हाताने मसाज करा.

Story img Loader