दिवाळीमध्ये पाच दिवस हो-नाही म्हणता म्हणता बरेच गोड पदार्थ खाल्ले जातात. अशावेळेस दिवाळीआधी आपण थोडी काळजी घेतलेली बरी असते. पण ते न जमल्यास किमान, दिवाळीदरम्यान आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष देणं गरजेचं असून, नंतर पथ्य पाळणं आवश्यक असते.
त्यासाठी फिसिको डाएट आणि अस्थेटिक क्लिनिकच्या [Fisico Diet and Aesthetic Clinic] संस्थापक, आहारतज्ज्ञ विधी चावला यांनी दिवाळीआधी करण्यासाठी हा खास ‘डाएट प्लॅन’ सांगितलेला आहे.

काय आहे हा प्लॅन पाहा :

दिवस पहिला

सकाळचा नाश्ता :
सकाळी पौष्टिक पदार्थांसोबत भरपेट नाश्ता करा. ओट्समध्ये फळं घालून त्यावर थोडे बदाम, सुकामेवा घालून त्याचा नाश्ता करू शकता.

दुपारचे जेवण :
दुपारच्या जेवणासाठी तुम्ही भाज्यांचे रंगीत सॅलेड खाऊ शकता. रंगीत सॅलेड तुम्ही वेगवेगळ्या भाज्या वापरून बनवा. त्यात प्रोटीनसाठी चिकन किंवा टोफूचे वापर करू शकता.

संघ्याकाळ :
संध्याकाळी फार काही न खाता एक कप ग्रीन टी प्यावा.

रात्रीचे जेवण :
रात्रीच्या जेवणात तुम्ही ब्राऊन राईस, उकडलेल्या भाज्या आणि प्रोटीनसाठी डाळीचा समावेश करा.

हेही वाचा : तुमच्या ‘नखाची’ सर कुणाला नाही; पण केवळ या १० नैसर्गिक गोष्टींचा वापर केलात तर, पहा या टिप्स

दुसरा दिवस

सकाळचा नाश्ता :
सकाळच्या नाश्त्यासाठी अंड्याच्या ऑम्लेटमध्ये भाजी आणि चीज घालून खाऊ शकता. सकाळच्या अशा भरपेट नाश्त्यामधून तुम्हाला प्रोटीन व आवश्यक पोषक घटक मिळण्यास मदत होईल.

दुपारचे जेवण :
दुपारच्या जेवण्यासाठी तुम्ही क्विनोआ [quinoa] किंवा हरभऱ्याचे सॅलेड खाऊ शकता.

संध्याकाळ :
संध्याकाळी फळांचे सॅलेड खाऊ शकता.

रात्रीचे जेवण :
रात्री जेवणासाठी तुम्ही ग्रील केलेले मासे खाऊ शकता. जर तुम्ही शाकाहारी असाल, तर परतलेल्या [stir-fry ] भाज्या खाऊ शकता.

दिवस तिसरा

सकाळचा नाश्ता :
नाश्त्यासाठी तुम्ही ग्रीक दही, त्यावर थोडं मध आणि बेरी [स्ट्रॉबेरी, मलबेरी इत्यादी] टाकून खाऊ शकता.

दुपारचे जेवण :
दुपारच्या जेवणासाठी तुम्ही व्हेजिटेबल रॅप, [भाजी आणि पोळीपासून तयार केलेला रोल] हरभऱ्यापासून तयार होणाऱ्या हमस [hummus] सोबत खाऊ शकता. यातून तुम्हाला फायबर आणि चांगले फॅट्स मिळू शकतात.

संध्याकाळी :
संध्याकाळी बाउल भरून फळं खाऊ शकता.

रात्रीचे जेवण :
रात्रीच्या जेवणात प्रोटीनयुक्त आहार घेण्यासाठी मांस किंवा मशरूमपासून बनवलेले पदार्थ खाऊ शकता.

दिवस चौथा

सकाळचा नाश्ता :
सकाळी-सकाळी तरतरी येण्यासाठी नाश्त्यामध्ये स्मूथीचा समावेश करा. पालक, केळं आणि बदामाच्या दुधापासून तयार झालेल्या या स्मूथीमधून तुम्हाला आवश्यक असणारी खनिजे आणि जीवनसत्वे मिळू शकतात.

दुपारचे जेवण :
दुपारच्या जेवणासाठी डाळ आणि त्यासोबत पोळी किंवा पूर्णधान्याचा ब्रेड खाऊ शकता.

रात्रीचे जेवण :
रात्रीच्या जेवणासाठी कार्बोहायड्रेट्स आणि फायबरयुक्त आहारासाठी भाजलेले रताळे, उकडलेली ब्रोकोली आणि हिरव्या भाज्यांचे सॅलेड हे घेऊ शकता.

दिवस पाचवा

सकाळचा नाश्ता :
सकाळचा नाश्ता प्रोटीनयुक्त करा. त्यासाठी पालक आणि टोमॅटो वापरून स्क्रॅम्बल्ड एग [अंड्याच्या भुर्जीच एक प्रकार] बनवा. याने तुमचे पोट बराचवेळ भरलेले राहण्यास मदत होईल.

दुपारचे जेवण :
दुपारच्या जेवणासाठी क्विनोआ आणि काळ्या बीन्सचा [काळा घेवडा] वापर करा. याची चव चांगली असतेच, सोबत शरीराला आवश्यक असे पोषक घटकदेखील यात असतात.

संध्याकाळी :
संध्याकाळी मधल्या वेळेत काकडी आणि गाजर खाऊ शकता.

रात्रीचे जेवण :
रात्रीच्या जेवणासाठी चिकन आणि परतलेल्या भाज्यांचा वापर करू शकता.

हेही वाचा : पालक वापरून बनवा चविष्ट डोसा; तांदळाऐवजी ‘हे’ धान्य वापरून होतील पौष्टिक; रेसिपी पाहा….

दिवस सहावा

सकाळचा नाश्ता
सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही मुसली [muesli] खाऊ शकता. मुसलीमध्ये दही आणि फळं घालून खाल्ल्याने शरीराला फायबर, प्रोटिन्स आणि जीवनसत्वे मिळण्यास मदत होईल.

दुपारचे जेवण :
दुपारच्या जेवणात मिनिस्टरोनी [minestrone] सूप आणि सोबत पूर्णधान्याचा ब्रेड घेऊ शकता.

रात्रीचे जेवण :
रात्रीच्या जेवणासाठी तुम्ही ब्राऊन राईस, ग्रील केलेले मासे किंवा भाज्यांचा वापर करू शकता. जेवणातून शरीराला आवश्यक असणारे, प्रोटीन आणि कार्ब्स मिळत आहेत ना तेवढं पाहा.

दिवस सातवा

सकाळचा नाश्ता :
शेवटच्या दिवसासाठी, पूर्णधान्याचे पॅनकेक बनवून ते दही आणि थोड्या मधासोबत खाऊ शकता.

दुपारचे जेवण :
दुपारच्या जेवणात हिरव्या भाज्यांचे सॅलेड आणि ग्रील केलेले टोफू घेऊ शकता.

संध्याकाळी :
संध्याकाळसाठी तुम्ही एक मूठ भरेल इतका सुकामेवा खाऊ शकता.

रात्रीचे जेवण :
रात्रीच्या जेवणासाठी तुम्ही ग्रील केलेला मासा आणि उकडलेल्या हिरव्या शेंगा खाऊ शकता.

सात दिवसांचे डाएट करत असताना भरपूर प्रमाणात पाणी पिण्यास विसरू नका. त्याचसोबत गोड पदार्थ खाण्याचे आणि मद्यपान करण्याचे टाळा. या गोष्टीदेखील अतिरिक्त कॅलरीज वाढवण्यास हातभार लावतात. आहारासोबतच हलका व्यायाम करा. यामध्ये चालणे, योगा यांसारख्या गोष्टी करू शकता. त्यामुळे तुमच्या शरीराची हालचाल होऊन पचनक्रियेला मदत होते.