आपल्या कपाटाच्या कुठल्यातरी खणामध्ये दडून बसलेल्या गरम कपड्यांची, जाड चादर आणि पांघरुणाची आता आपल्याला गरज जाणवू लागलेली आहे. या अशा हिवाळ्यातील गार हवेपासून तेच आपल्याला उब देतात आणि थंडीपासून रक्षण करतात. मात्र, त्यांना स्वच्छ ठेवणे आणि वेळोवेळी योग्य पद्धतीने धुणे हे आपले काम आहे.

परंतु, असे लोकरीचे मऊ कपडे म्हणा किंवा जाड ब्लँकेट किंवा पांघरुणं म्हणा, खराब न होऊ देता कसे स्वच्छ करावे, हा एक मोठा प्रश्न असतो. अशा नाजूक गोष्टींना योग्य पद्धतीने धुण्यासाठी ‘गोदरेज अप्लायन्सेस’च्या वॉशिंग मशीन उत्पादन गटाचे प्रमुख, शशांक सिन्हा यांनी काही टिप्स दिल्याचे न्यूज १८ च्या एका लेखातून समजते. पाहा.

betel leaves expensive, betel leaves,
विड्याची पाने का महागली ? जाणून घ्या, अतिवृष्टी, संततधारेचा परिणाम काय?
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Best time for Job Hunting
Best time for Job Hunting : कोणत्या महिन्यांमध्ये नोकरी शोधावी? जाणून घ्या, नोकरी शोधण्याची सर्वोत्तम वेळ
What to do when the car is stuck in traffic
ट्रॅफिकमध्ये गाडी अडकल्यावर काय काळजी घ्यावी? ‘या’ सोप्या टिप्सने होईल मदत
cases of dengue, Mumbai, chikungunya, lepto,
मुंबईमध्ये हिवताप, डेंग्यू, चिकुनगुन्या, लेप्टोच्या रुग्णांमध्ये वाढ
titwala police arrested accused, girl molested
टिटवाळ्याजवळील दहागावमध्ये दोन वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार
Gold Silver Price
Gold-Silver Price: ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद! दरवाढीनंतर सोन्याचे भाव झालेत कमी, १० ग्रॅमची किंमत जाणून घ्या
Pune, respiratory disorders, humidity, asthma, allergies, fungal growth, health experts, Sassoon Hospital, health news
पावसाळ्यातील ओलसर हवेमुळे आजारांना निमंत्रण! जाणून घ्या कशी घ्यावी काळजी…

हिवाळ्यात नाजूक कपडे योग्य पद्धतीने धुण्याच्या सात टिप्स

१. लेबल्स तपासून पाहावे

कपड्यांच्या मागे, खास करून हिवाळी कपड्यांच्या आतील भागात एक लेबल लावलेले असते; ज्यामध्ये तो ठराविक कपडा कसा धुणे गरजेचे आहे ते सांगितलेले असते. तुम्ही ते लेबल नीट वाचल्यास, ते कापड धुताना पाण्याचे तापमान कसे असले पाहिजे, मशीनमध्ये धुवून चालेल की नाही, स्पिन करून चालेल का, साबण वापरावा की नाही; अशा सर्व सूचना दिलेल्या सापडतील.

हेही वाचा : २०२४ या नवीन वर्षातील ‘आठ सवयी’ कायम देतील तुम्हाला सकारात्मक ऊर्जा; काय आहेत टिप्स जाणून घ्या

२. लोकरीचे कपडे वेगळे धुणे

सर्व कपड्यांसोबत लोकरीचे कपडे धुवू नका. त्याऐवजी लोकरीचे, विणकाम केलेले, थंडीचे जॅकेट यांसारख्या नाजूक कपड्यांना बाजूला करावे. यामुळे इतर कपड्यांचा त्रास या नाजूक कपड्यांना होणार नाही. त्यासोबत रंग लागण्याचा धोका असतो, तो देखील टाळला जाऊ शकतो. हिवाळी कपडे धुताना त्यांना उलट करून, म्हणजे आतील बाजू बाहेर करावी आणि मगच मशीनमध्ये धुण्यासाठी टाकावे. यामुळे तुमचे कपडे खराब होणार नाहीत.

३. लोकरीच्या कपड्यांवरील डाग काढणे

लोकरीच्या कपड्यांना डाग लागल्यास प्रथम डाग काढणाऱ्या साबणाला किंवा स्टेन रिमूव्हरला पाण्यामध्ये मिसळून डाग लागलेल्या भागावर घालून तो भाग स्वच्छ करून घ्यावा. त्यानंतर कापड मशीनमध्ये धुण्यासाठी टाकावे.

४. योग्य साबणाचा वापर करणे

गार पाणी आणि नाजूक कपड्यांसाठी असणाऱ्या साबणाचा वापर करावा. लोकरीचे कपडे नाजूक असतात, त्यामुळे त्यांच्यावर अधिक रसायने असणारे साबण वापरल्यास ते लवकर खराब होऊ शकतात. तसेच जास्त प्रमाणात साबण वापरल्यानेही तुमच्या कपड्यांवर त्याचा चुकीचा परिणाम होऊ शकतो.

हेही वाचा : सकाळपासून रात्रीपर्यंत राहाल प्रचंड उत्साही; रिकाम्यापोटी केवळ ‘हे’ पदार्थ खाणे ठरेल फायदेशीर, टिप्स पाहा…

५. मशीनमध्ये कपडे कोंबणे

एकाचवेळी भरमसाठ कपडे मशीनमध्ये कोंबू नका. असे केल्याने सर्व कपड्यांवर त्याचा परिणाम होऊन कोणताही कपडा स्वच्छ धुतला जात नाही. त्यामुळे मर्यादित कपडे धुण्यासाठी टाकून, मशीनला व्यवस्थित फिरू द्यावे. कपडे अधिक असल्यास त्यांचे विभाजन करावे.

६. वॉशिंग मशीनचे योग्य सेटिंग निवडणे

तुम्ही जर लोकरीचे किंवा नाजूक कपडे मशीनमध्ये धुणार असाल, तर मशीनचे योग्य सेटिंग वापरणे गरजेचे असते. नाजूक कपडे धुताना जेंटल किंवा डेलिकेट वॉशिंग असा ऑप्शन निवडावा. यामध्ये मशीन फिरण्याचा वेग कमी असतो, ज्यामुळे कपड्यांना हानी न पोहोचता ते स्वच्छ धुतले जातात.

७. कपडे योग्य पद्धतीने वाळवणे

कपडे धुवून झाल्यानंतर त्यामधील अतिरिक्त पाणी हलक्या हाताने पिळून काढून टाकावे. कमी सूर्यप्रकाश असणाऱ्या ठिकाणी हे कपडे हवेवर वाळण्यासाठी ठेवून द्या. यामुळे कपडे आकसणार नाही किंवा त्यांचा रंगदेखील उडणार नाही. कपडे घडी घालून खणात ठेवण्याआधी ते पूर्णतः वाळले असल्याची खात्री करावी. कपडे दमट असल्यास त्यास कुबट वास येऊ शकतो व तसेच खणात राहिल्यास त्याला बुरशी लागून कपडे खराब होऊ शकतात.

शशांक सिन्हा यांनी सुचवलेल्या या टिप्स वापरल्यास तुमचे लोकरीचे कपडे स्वच्छ आणि अधिक चांगल्याप्रकारे टिकून राहण्यास मदत होईल.