Health Tips: मासिकपाळीच्या काळात अनेक मुलींना या दिवसात स्वतःला कसे स्वच्छ ठेवावे हे माहित नसते. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये स्वतःला स्वच्छ ठेवण्याची जास्त गरज असते, अन्यथा तुम्हाला संसर्ग पसरू शकतो. अशा परिस्थितीत पावसाळा असेल तर स्वच्छतेची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. कारण या हंगामात संसर्ग होण्याची शक्यता अधिक वाढते. तर आम्ही तुम्हाला पावसाळ्यात मासिकपाळी दरम्यान स्वतःला स्वच्छ कशाप्रकारे ठेवता येईल याबद्दल काही टिप्स सांगणार आहोत.
तुमच्या थोड्याशा निष्काळजीपणामुळे युरिनरी ट्रॅक्ट आणि योनि इन्फेक्शन होऊ शकते. बहुतेक स्त्रिया एकच नॅपकिन बराच काळ वापरतात जे योग्य नाही. त्यामुळे दर तीन ते चार तासांनी नॅपकिन बदलावे. चला, जाणून घेऊया मासिक पाळीच्या काळात कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.
(हे ही वाचा : मासिक पाळीच्या असह्य वेदनांपासून मुक्त होण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय करा; नक्कीच आराम मिळेल)
साबण वापरू नका
पीरियड दरम्यान महिला प्रायव्हेट पार्टवर सामान्य साबण वापरतात, जे योग्य नाही. यामुळे नैसर्गिक पीएच पातळी बिघडू शकते. बाजारात अनेक प्रायव्हेट पार्ट वॉश उपलब्ध आहेत जे तुम्ही तुमच्या मासिक पाळीत वापरावे.
प्रायव्हेट पार्ट पूर्णपणे कोरडा करा
मासिक पाळीमुळे तुमचा प्रायव्हेट पार्ट आधीच खूप ओला असतो आणि पावसामुळे हवामानात देखील ओलावा कायम असतो. अशा परिस्थितीत जेव्हा महिला शौचालयात गेल्यावर किंवा पाणी वापरल्यानंतरही तो भाग कोरडा करत नाहीत, तेव्हा ओलेपणा आणखी वाढतो. यामुळे संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे जेव्हाही तुम्ही टॉयलेटला जाल तेव्हा टिश्यू पेपरच्या साहाय्याने तुमचा प्रायव्हेट पार्ट पूर्णपणे कोरडा करा आणि मग पॅड वापरा.
( हे ही वाचा: Periods Diet: जर तुम्हालाही मासिक पाळीदरम्यान जास्त रक्तस्राव होत असेल तर आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश करा)
कोमट पाण्याचा वापर करा
मासिक पाळी दरम्यान, दररोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्याने तुमचा प्रायव्हेट पार्ट स्वच्छ करा. यानंतर टिश्यू पेपरच्या साहाय्याने तो भाग नीट वाळवा आणि पॅड घ्या. यामुळे संसर्ग होण्याची शक्यता खूप कमी होते.
सार्वजनिक स्वच्छतागृहे वापरण्यास टाळावे
मासिक पाळी दरम्यान सार्वजनिक स्वच्छतागृहे न वापरल्यास चांगले होईल. जर तुम्ही ते वापरत असाल तर प्रथम सॅनिटायझर किंवा टॉयलेट स्प्रे वापरण्याची खात्री करा.