Kharmas December 2021 : खरमास दरवर्षी मार्गशीर्ष आणि पौष महिन्यात येतात. जेव्हा सूर्य धनु राशीत प्रवेश करतो, तेव्हा खरमास सुरू होतो. ज्योतिषांच्या मते, खरमासमध्ये विवाह, साखरपुडा, मुंडण आणि इमारत बांधणे यासारखी शुभ कार्ये निषिद्ध मानली जातात. यावर्षी १६ डिसेंबरला सूर्य धनु राशीत प्रवेश करताच खरमास असेल आणि १४ जानेवारीला त्याची समाप्ती होईल. १५ डिसेंबर रोजी दुपारी ०३.४२ ते १४ जानेवारी २०२२ रोजी दुपारी ०२.२८ पर्यंत खरमास असेल. तोपर्यंत सर्व शुभकार्य बंद राहतील. यामागे एक पौराणिक कथा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ही आहे पौराणिक कथा
खरमासच्या आख्यायिकेनुसार, सूर्यदेव आपल्या सात घोड्यांवर स्वार होऊन ब्रह्मांडाभोवती फिरतात. या प्रदक्षिणादरम्यान सूर्यदेव कुठेही थांबत नाही. परिक्रमा करत असताना त्यांना कुठेही थांबण्याची परवानगी नव्हती. जर सूर्यदेव थांबले तर संपूर्ण विश्व थांबेल आणि त्यामुळे सगळीकडे हाहाकार माजेल. त्यामुळे सूर्यदेव परिक्रमा करत असताना कुठेच थांबू शकत नव्हते. मात्र रथाला जोडलेले घोडे विश्रांतीअभावी थकतात. हे पाहून सूर्यदेव भावूक होतात. पण रथ थांबला तर अनर्थ होईल, हे सूर्यदेवाला माहित असतं. म्हणून मग सूर्यदेव यांनी त्यांच रथ एका तलावाजवळ नेलं तिथे त्यांना दोन खर (गाढव) दिसतात. सूर्यदेव आपल्या घोड्यांना पाणी पिण्यासाठी तलावात घेऊन जातात आणि दोन खर आपल्या रथाला जोडून ब्रह्मांडाची प्रदक्षिणा सुरू ठेवतात. बरीच मेहनत घेत हे दोन खर रथ ओढतात पण यात रथाचा वेग मंदावतो. त्यामूळे सूर्यदेव कशीतरी एक महिन्याची परिक्रमा पूर्ण करतात आणि नंतर पुन्हा आपले घोडे रथाला जोडून पुढची परिक्रमा सुरू करतात. या एक महिन्याचा कालवधीत असतो तो खरमास.

खरमासात काय करावे आणि काय करू नये ?

१. खरमास दरम्यान विवाह, साखरपुडा, मुंडण, गृहप्रवेश इत्यादी करू नये.

२. खरमासाचा काळ अशुभ मानला जातो, त्यामुळे या काळात नवीन व्यवसाय किंवा काम करू नये.

३. खरमासाच्या वेळी सून किंवा मुलीला निरोप देऊ नये.

४. खरमासात संध्याकाळी दिवा लावा आणि तुळशीची पूजा करा. हा उपाय तुमच्या समस्या दूर करू शकतो.

५. खरमासाच्या काळात निस्वार्थी दानाला खूप महत्त्व आहे. या महिन्यात तुम्ही कोणत्याही अपेक्षेशिवाय एखाद्याला दान करता तेव्हा तुम्हाला अक्षय पुण्य मिळते. लोकांना मदत केली पाहिजे.

६. खरमासाच्या काळात सूर्यदेवाची हालचाल मंदावते, सूर्याचा प्रभाव कमी असतो. अशा स्थितीत सूर्यदेवाला जल अर्पण करावे आणि त्यांच्या मंत्रांचा जप करावा. त्यांच्या कृपेने सुख, समृद्धी आणि प्रगती होईल.

७. गुरू ग्रहाचा प्रभाव खरमासातही कमी असतो, त्यामुळे देव गुरु बृहस्पती यांची पूजा करावी. असे केल्याने कुंडलीत गुरु दोष किंवा गुरूची वाईट स्थिती सुधारू शकते.

८. तुम्ही खरमासमध्ये भगवान विष्णू आणि श्री कृष्णाची पूजा करू शकता. विष्णु सहस्रनामाचे पठण करणे देखील फायदेशीर ठरेल. विष्णूच्या कृपेने सर्व दु:ख दूर होऊन पापांचा नाश होतो.