Jugaad Video: उन्हाळा सुरू झाला असून, देशातील बहुतांश भागात नागरिकांना कडक उन्हाचा तडाखा सहन करावा लागत आहे. त्यामुळे घरात कुलर एसीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. एसीचा रिमोट वारंवार वापरल्याने तो लवकर घाण होतो. हा एसीचा रिमोट साफ करण्यासाठी खूप उपाय करुनही तो नीट स्वच्छ करता येत नाही. यावरच एका महिलेने भन्नाट जुगाड दाखविला आहे. या जुगाडाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
गृहिणींकडे काही ना काही किचन जुगाड असतात. दरम्यान अशाच एक जुगाड दाखवणारा अनोखा व्हिडीओ एका महिलेने शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तुम्ही कधी रिमोटला चपातीचं पीठ लावलं आहे का? नाही ना.. मग एकदा रिमोटला चपातीचं पीठ लावून बघा. हा जुगाड तुमच्या दैनंदिन जीवनातील समस्यांवर मात करेल. चपातीचं पीठ लावल्यानंतर रिमोटमध्ये झालेले बदल पाहून तुम्ही थक्क होऊन जाल. एका गृहिणीने या जुगाडाचा शोध लावला असून या अनोख्या जुगाडाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
(हे ही वाचा: Jugaad Video: कुलर सुरु करण्याआधी ‘हा’ सोपा जुगाड करुन पाहा; मिनिटांत होईल तुमचा कुलर स्वच्छ, कुबट वास येणार नाही!)
आजकाल प्रत्येक घरांमध्ये कित्येक इलेक्ट्रिक उपकरणं असतात. यातील टीव्ही आणि एसीसारख्या काही उपकरणांना चालवण्यासाठी रिमोटची गरज भासते. रिमोटच्या वारंवार वापराने तो खराब होऊ लागतो. अनेकदा त्याच्यावर धूळ साचली जाते. त्यामुळे तुमच्या घरातील रिमोट खराब दिसू लागतो. रिमोटचं घाण काढण्यासाठी अनेकांना खूप मेहनत करावी लागते. आता याच समस्येवर एका महिलेने भन्नाट उपाय सुचविला आहे.
व्हिडीओत तुम्ही पाहाल तर गृहिणीने, अस्वच्छ झालेला रिमोट घेतला आहे. या अस्वच्छ रिमोटला स्वच्छ करण्यासाठी पोळी बनविण्यासाठी मळलेल्या पिठाचा एक छोटासा गोळा महिलेने घेतला आहे आणि या छोट्यासा गोळ्याला घेऊन रिमोटवर फिरविले आहे. महिलेने प्रत्येक बटणाच्या मध्यभागी गोळ्याच्या मदतीने घाण काढलं आहे. महिलेच्या म्हणण्यानुसार, पोळीचा पीठ चिकट असल्याने रिमोटवरील घाण पटकन निघून जाईल, असा दावा महिलेने केला आहे.
येथे पाहा व्हिडिओ
Shreya’s creative corner या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा जुगाड तुम्हीही नक्की ट्राय करुन पाहा आणि खरंच याचा फायदा तुम्हाला झाला का, हे आम्हाला कमेंट करुन कळवा.
(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या व्हिडीओवर आधारित आहे. लोकसत्ता याची पुष्टी करत नाही.)