Parenting Tips: मुलांना अभ्यासाची आवड नसते, ही काही नवीन गोष्ट नाही. अशी अनेक मुले आहेत ज्यांना अभ्यास ही शिक्षा वाटते आणि ते फक्त खेळावर लक्ष केंद्रित करतात. बाहेरच्या मित्रांच्या गोंगाटात आणि हसण्यात कोणाला जावे वाटणार नाही, यात मुलांचाही दोष नाही. परंतु, मुलांच्या अभ्यास न करण्याच्या सवयीमुळे पालकांना त्यांची खूप चिंता वाटत असते. कारण मुलांनी अभ्यास केला नाही तर, सहाजिकपणे शाळेत शिकवल्या जाणाऱ्या गोष्टी नीट समजणार नाही आणि मग ज्या वेगाने शिकायला हवे त्या गतीने ते सर्व काही शिकू शकणार नाहीत. परंतु, मुलांच्या अभ्यासात रस नसण्यामागे इतरही अनेक कारणे असू शकतात. अशा परिस्थितीत, येथे जाणून घ्या की, पालक म्हणून तुम्ही मुलाला अभ्यास करण्यासाठी कसे प्रोत्साहित करू शकता आणि मुलाला अभ्यास आवडू लागेल यासाठी काय करू शकता?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अशी लागेल मुलांना अभ्यासाची गोडी; स्वत:हून पुस्तक घेऊन अभ्यास करतील

अभ्यास करताना मुलांजवळ बसा पण त्यांचा टेन्शन वाढवू नका
जेव्हा मुलं अभ्यास करत असतील तेव्हा तुम्ही त्याच्या जवळ बसू शकता. पण, मुलाचे टेन्शन वाढवणार नाही यासाठी प्रयत्न करा. जर कोणी मुलासोबत बसले तर त्यांना अभ्यास करण्याची इच्छा होते आणि कंटाळा येत नाही, पण पालकांच्या उपस्थितमध्ये त्यांना भीती वाटत असेल किंवा आई-वडील मुलांना ओरडत असतील तर मुल घाबरतात. त्यामुळे अभ्यासामधून त्यांचे पूर्णपणे लक्ष विचलित होते.

हेही वाचा – तुपामध्ये ‘या’ गोष्टी मिसळून खाल्यास आरोग्याला होईल फायदा, कोणत्या ते जाणून घ्या

वाचा वेळ निश्चित

जर रोज एकाच वेळी अभ्यास करायला बसत असाल तर मुलांना त्याच वेळी अभ्यास करण्याची सवय लागते. प्रयत्न करा मुलं नेहमी अभ्यासाचे वेळापत्रक पाळतील. मुलांचे खेळण्याचे वेळापत्रकही तयार करा आणि खेळण्याच्या वेळी त्याला अभ्यासासाठी बसवून ठेवू नका.

अभ्यासाला बनवा रंजक

मुलांना सांगा की, नवनवीन गोष्टी शिकून ते जगभरात कित्येक गोष्टी समजून घेऊ शकतात. त्यांना गुणांची चिंता करण्याची आवश्यकता नाही आणि फक्त शिकण्याकडे लक्ष द्या, हे सांगा. त्यांच्या आवडी निवडी लक्षात घेऊन अभ्यासासाठी व्हिडिओही दाखवू शकता.

हेही वाचा – हाडे निरोगी आणि मजबूत ठेवण्यासाठी तुमच्या जीवनशैलीत करा हे ५ बदल करा

लक्ष विचलित होऊ देऊ नका
मुलं जिथे बसून अभ्यास करत आहे तिथे त्यांचे लक्ष विचलित होऊ देऊ नका. मुलाचे लक्ष अभ्यासातून वळले तर त्यांना पुन्हा अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करणे फार कठीण जाते. जेवढे शांत वातावरण असेल तेवढे चांगले.

छोटी छोटी विश्रांती घ्या
जर तुम्ही २ तासांचा वेळ अभ्यासासाठी काढला आहे तर मुलांना २ तासांमध्ये सतत अभ्यास करण्यासाठी सांगू नका. त्याऐवजी मध्ये छोटी विश्रांती घेऊ द्या. मुलांना पिण्यासाठी ज्यूस किंवा खाण्यासाठी फळ आणि सॅलड देऊ शकता ज्यामुळे त्याचे अभ्यासात लक्ष राहील आणि भूक- तहान लागणार नाही.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kids dont like to study then try these tips they will love study and they will study themselves snk