Kitchen Hacks: अनेक घरांमध्ये वर्षभरासाठी तांदूळ किंवा अन्य कोणत्याही धान्यांची साठवणूक केली जाते. मात्र कोणत्याही धान्याचा साठा करुन ठेवायचा असेल तर त्याची विशेष काळजी घेणंही तितकंच गरजेचं असतं. अनेक वेळा वातावरणातील बदल किंवा तांदूळाची योग्य काळजी न घेतल्यामुळे ते खराब होतं. त्यांच्यात किड लागते किंवा अळ्या लागणे या सारख्या समस्या निर्माण होतात. मात्र तांदळाची योग्य ती काळजी घेतल्यानंतर या समस्या निर्माण होत नाही. त्यामुळे अशा काही घरगुती टिप्स आहेत, ज्यांच्यामुळे तांदळांना लागणाऱ्या कीडपासून आपण त्याचं संरक्षण करु शकतो. चला तर मग जाणून घेऊयात या टिप्स ज्यामुळे आपण साठवलेल्या तांदळाला कीड आणि अळ्या यांचा प्रादुर्भाव होणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तांदळात ‘या’ वस्तू टाका

१. तमालपत्राची पाने

तांदळाचा किड्यांपासून बचाव करण्यासाठी डब्यामध्ये तमालपत्राची पाने ठेवावीत. तमालपत्रामुळे खूपच फायदा मिळतो. तांदळात १० ते १५ तमालपत्र घालून ठेवा. तांदळाला कीड लागली असेल तर तमालपत्र हा त्याचा उत्तम पर्याय आहे. कारण तमालपत्राचा सुगंध कीड सहन करू शकत नाही आणि त्यामुळे त्याचा नायनाट होतो. 

२. कडुलिंबाची पाने

बहुगुणी कडुलिंबाच्या पानांचा वापर करुन आपण तांदळाला लागणारी कीड थांबवू शकतो. कडुलिंबाचा सुगंध तांदूळ खाण्यापासून कीटकांना प्रतिबंधित करतो. कडुलिंबाच्या पानामुळे कीड ही मुळापासूनच नष्ट होते आणि तांदळातून संपूर्ण कीड निघून जाण्यास मदत मिळते. दरम्यान, ही कडुलिंबांची पाने ठेवताना ही पाने ओली नसावीत, हे लक्षात ठेवा. 

३. लवंग

जर तुम्हाला तांदळाला किड्यांपासून बचाव करायची असेल तर डब्यात १० ते १२ लवंग टाकून ठेवा. लवंगाच्या वासाने किडे दूर पळतात. हा चांगला उपाय आहे. तांदळाच्या डब्यात किडे असतील ती निघून जातात. जर कीड लागली नसेल तर त्यात कीड होऊ नये, यासाठीही लवंगेचा उपयोग करता येतो. किटाणुनाशक म्हणून लवंगेचा फायदा होतो. 

(हे ही वाचा : अंडी उकडताना फुटतात किंवा खराब होतात? ‘या’ ४ सोप्या किचन टिप्स वापरून पाहा, सोलताना होणार नाही त्रास!)

४. लसूण

लसणामुळे देखील तांदळाला कीड लागत नाही. तांदूळ किड्यांपासून वाचविण्यासाठी तुम्ही तांदळाच्या डब्यात न सोललेली लसूण पाकळ्या ५-६ टाकून ठेवा आणि तांदळामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या. जेव्हा लसणीच्या पाकळ्या पूर्ण सुकतील तेव्हा त्या बाहेर काढा आणि दुसऱ्या घाला. लसणीचा वास हा कीड न लागण्यास मदत करतो. 

५. रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा

तांदूळ रेफ्रिजरेटरमध्ये ठेवणे हा उत्तम उपाय आहे. तुम्ही फ्रिजरमध्ये तांदूळ डब्यात ठेऊ शकता. दुकानातून आणलेल्या तांदळात जर कीड लागली असेल तर फ्रिजरच्या थंड तापमानामुळे त्यातील किडे आणि त्यांची अंडी थंड तापमानामुळे नष्ट होतात. 

६. उन्हात ठेवा

तांदळाला किड लागू नये, म्हणून तांदूळ काही वेळ उन्हात ठेवा. तांदळात सोनकिडे असतील तर तांदूळ काही वेळेसाठी उन्हात ठेवा. पण जर तुम्हाला तांदळाला बरेच दिवस साठवायचे असेल तर ती जास्त वेळ उन्हात ठेवू नका. अन्यथा तांदूळ तुटण्याची शक्यता असते. 