Food Hacks tips to reduce excess salt from food: आपल्या अन्नाला चवदार बनवण्यात मीठ महत्त्वाची भूमिका निभावते. बर्‍याच वेळा खूप चांगला स्वयंपाक बनलेला असताना, केवळ त्यात मीठ जास्त पडले की आपल्या तोंडाची चव पूर्ण खराब होते. बर्‍याच लोकांना जेवणात जास्त मीठ खायला आवडते. मात्र, दररोज जास्त प्रमाणात मीठ सेवन आरोग्यासाठी हानिकारक आहे. बर्‍याच वेळा, आपण अन्न शिजवता तेव्हा कमीतकमी मीठ घालण्याचा प्रयत्न केला जातो. एखाद्या पदार्थात मीठ कमी पडले तर, त्याचे प्रमाण वाढवता येते. परंतु, जास्त प्रमाणात मीठ पसल्यास काय करावे, हे समजत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अशा परिस्थितीत अन्न फेकून दिले जाते किंवा जास्त प्रमाणात मीठ दुरुस्त करण्याच्या प्रक्रियेत त्या पदार्थाची चव निघून जाते. जर तुमच्याकडूनही अशी चूक झाली असेल आणि अन्नाची नासाडी झाली असेल, तर पुढच्यावेळेस या टिप्स नक्की लक्षात ठेवा. चला तर, जेवणात पडलेले अतिरिक्त मीठ कमी असे करावे याच्या सोप्या टिप्स जाणून घेऊया…आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत, ज्याने तुम्ही जेवणात जास्त झालेले मीठ कमी करू शकता.

तूप –

पदार्थामध्ये मीठ जास्त झाल्यास त्यामध्ये २ ते ३ चमचे तूप घालणं फायदेशीर ठरतं. त्यामुळे पदार्थातील मिठाचं प्रमाण संतुलित रहातं.

लिंबाचा रस –

तुम्ही तयार केलेल्या भाजीमध्ये मीठ जास्त झालं तर त्यामध्ये लिंबाच्या रसाचे ४ ते ५ थेंब टाकावे. त्यामुळे मिठांचं प्रमाण कमी होण्यास मदत होईल आणि भाजीची चवही बिघडणार नाही.

बटाटा –

जर तुम्ही रस्सा भाजी किंवा वरण बनवताना मीठ जास्त झालं असेल तर अशावेळी तुम्ही बटाट्याचा वापर करू शकता. त्यामध्ये बटाट्याचे काप घाला. बटाटा पदार्थातील मीठ शोषून घेईल त्यामुळे त्याची चव सामान्य होईल. थोड्या वेळाने बटाट्याचे काप काढून घ्या. उकडलेल्या बटाट्यांचा वापर करणं फायदेशीर ठरेल.

चण्याची डाळ

भाजीमध्ये मीठ जास्त झाल्यास त्यामध्ये चण्याची डाळ घालणं फायदेशीर ठरतं. त्यासाठी २ ते ३ चमचे चण्याची डाळ पाण्यात भिजत घालावी.

दही

एखादा पदार्थ खारट झाल्यास त्यामध्ये शक्य असल्यास तुम्ही दह्याचा वापर करू शकता. त्यामध्ये २ ते ३ चमचे दही घाला. त्यामुळे जास्त झालेल्या मिठाचं प्रमाण संतुलित होण्यास मदत होईल.

ब्रेडचे तुकडे

रस्सा भाजीमध्ये मीठ जास्त झाल्यास त्यामध्ये ब्रेडचे तुकडे घालणं फायदेशीर ठरतं. ब्रेड भाजीतील एक्सट्रा मीठ शोषून घेतो. त्यामुळे खारटपणा कमी होण्यास मदत होते.

काजू –

पदार्थातील खारटपणा दूर करण्यासाठी काजूची पेस्टही फायदेशीर ठरते. त्यामुळे भाजीला वेगळी चव मिळण्यासोबतच मिठाचंही प्रमाण कमी होण्यास मदत होईल.

हेही वाचा – Kitchen Jugaad : झोपण्याआधी बेडवर चहाची गाळणी फिरवा; सकाळी डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

पीठ (कणीक) –

एखाद्या पदार्थातील मिठाचे प्रमाण कमी करण्यासाठी तुम्ही पीठाचा वापर करू शकता. त्यामुळे पदार्थाचा खरटपणा कमी होतो. यासाठी पीठाचे २ ते ३ लहान गोळे पदार्थामध्ये टाका. जास्त मीठ शोषून घेईल. काही वेळाने पीठाचे गोळे काढून टाका.