अनेकदा महिलांची तक्रार असते की, घरात फुल क्रीम दूध वापरूनही जाड साय येत नाही. तुमच्यासोबतही असेच काही होत असेल तर दुधावर घट्ट साय आणण्यासाठी काही सोप्या फॉलो करा. चला तर मग जाणून घेऊया दुधावर घट्ट साय/मलई कशी आणायची.

या टिप्स करा फॉलो

दुधात घट्ट साय आणण्यासाठी सर्वप्रथम हे लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही दूध उकळून झाल्यावर एकदम गॅस पूर्णपणे बंद करू नका.

उकळलेले दूध २ मिनिटे मंद आचेवर पुन्हा उकळू द्या. यानंतर, गॅस बंद करा.

जर तुम्ही दुधाच्या भांड्यावर झाकण्यासाठी प्लेट वापरत असाल तर हवा जाण्यासाठी थोडी जागा सोडा.

(हे ही वाचा: मधुमेहींसाठी ‘हे’ फळ आहे खूप फायदेशीर, रक्तातील साखर करते नियंत्रित)

दूध थंड झाल्यावर ते न ढवळता फ्रीजमध्ये ठेवा.

काही तासांनंतर तुम्हाला दिसेल की दुधावर जाड साय आली आहे.

Story img Loader