स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके असावे असा प्रयत्न प्रत्येक गृहिणीचा असतो. त्यातही गॅसच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जाते, कारण जेवण बनवताना मसाले किंवा इतर पदार्थ गॅसवर पडण्याची शक्यता असते. तसेच गॅसवरील बर्नर उष्णतेमुळे काळा पडण्याची शक्यता असते. त्यामुळे अनेक प्रयत्न करूनही तो स्वच्छ होत नाही, अशावेळी तुम्ही बर्नर स्वच्छ करण्यासाठी काही टिप्स वापरू शकता, कोणत्या आहेत त्या टिप्स जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गॅस बर्नर स्वच्छ करण्याच्या टिप्स

  • थोडे पाणी गरम करून त्यात लिंबू पिळा आणि या पाण्यात रात्रभर गॅस भरणार ठेवा त्यानंतर सकाळी लिंबाच्या सालीने बर्नर घासून स्वच्छ करा. यामुळे त्यावरील काळपटपणा निघून जाईल.
  • एका भांड्यात थोडे थोडे व्हिनेगर घेऊन त्यात एक मोठा चमचा बेकिंग सोडा टाका. यामध्ये रात्रभर बर्नर ठेवा आणि सकाळी जुन्या टूथब्रशने बर्नर स्वच्छ करा.
  • थोडे पाणी गरम करून त्यात लिंबू पिळा आणि इनो टाका. या मिश्रणामध्ये १५ मिनिटांसाठी बर्नर ठेवा. यामुळे बर्नर लगेच स्वच्छ होण्यास मदत मिळेल. यासाठी तुम्ही डिटर्जंट पावडरचाही वापर करू शकता.
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kitchen hacks how to clean gas burner use these easy tips pns