हिवाळ्यात वातावरणातील बदलाचा परिणाम फळं आणि भाज्यांवरही झालेला दिसून येतो. हिवाळ्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या भाज्या उपलब्ध असतात. त्यामुळे गरजेपेक्षा जास्त भाज्या आणल्या जातात. पण या भाज्या वातावरणातील बदलामुळे लगेच खराब होण्याची शक्यता असते, त्यामुळे हिवाळ्यात भाज्या साठवताना काही टिप्स वपारल्यास त्याचा नक्की फायदा होईल, कोणत्या आहेत त्या टिप्स जाणून घ्या

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हिवाळ्यात भाज्या साठवण्यासाठी वापरा या टिप्स :

आणखी वाचा : ‘जेव्हा ती एकटी…’ मुंबई लोकलमधील हा व्हिडीओ व्हायरल का होतोय एकदा पाहाच

फळं आणि भाज्या स्वच्छ करा
फळं आणि भाज्या घरी आणल्यानंतर आठवणीने स्वच्छ करा. भाज्या किंवा फळं न स्वच्छ करता तशीच फ्रिजमध्ये ठेवल्यास त्यावरील जंतू इतरत्र पसरु शकतात, तसेच फळं आणि भाज्या फक्त थंड पाण्याने धुवू नका. पूर्णपणे जंतू नष्ट होण्यासाठी पाणी कोमट करून त्यात दोन चमचे व्हिनेगर टाका, नंतर या पाण्यातून भाजी, फळं स्वच्छ धुवून घ्या.

फळं आणि भाज्या नीट सुकवून फ्रिजमध्ये ठेवा
हिवाळ्यात फळं आणि भाज्यांमध्ये ओलावा जास्त असू शकतो. त्यामुळे जास्त काळ टिकण्यासाठी फळं आणि भाज्या नीट सुकवून फ्रिजमध्ये ठेवा.

प्लास्टिकचा डब्बा किंवा पॅकेट्समध्ये साठवा
फळं किंवा भाज्या जास्त दिवस टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही प्लास्टिकचा डब्बा किंवा पॅकेट्सचा वापर करू शकता.