Kitchen Jugaad Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे घरगुती उपाय सांगणारे व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ इतके फायदेशीर असतात की परिणाम पाहून अनेकदा आपण आश्चर्यचकीत होतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. चहा पावडरमध्ये कात्री टाकताच कमाल झाली. तुम्हाला वाटेल चहा पावडरमध्ये कात्री टाकल्यामुळे काय झाले? पण त्यासाठी तु्म्हाला हा व्हिडीओ नीट पाहावा लागेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनेकदा आपल्या घरातील कात्रीवर गंज जमा होतो आणि कात्री नीट चालत नाही. अशावेळी आपण ती कात्री फेकून देऊन दुसरी कात्री विकत घेतो पण यानंतर असे करू नका. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक हटके ट्रिक सांगितली आहे. या ट्रिकच्या मदतीने तुम्ही चहा पावडरमुळे कात्रीवरील गंज दूर करू शकता. व्हिडीओत सांगितल्याप्रमाणे, सुरूवातीला एका भांड्यात चहा पावडर घ्या. त्यात बेकींग सोडा टाका. त्यानंतर यात पांढरा कोलगेट टाका आणि सर्व मिश्रण एकत्र करा.

हे मिश्रण या कात्रीवर कापसाच्या मदतीने नीट घासा. तुमच्या कात्रीवरील जमा झालेली गंज निघून जाईल. त्यानंतर गॅस सुरू करा आणि कात्रीला गॅसवर गरम करा त्यानंतर ही कात्री चहा पावडरच्या डब्यात कात्री चालवा त्यानंतर पुन्हा गॅसवर कात्री गरम करा आणि चहा पावडरच्या डब्यात चालवा.असे चार पाच वेळा करा. यामुळे तुमच्या कात्रीला धार येईल आणि बोथटपणा दूर होईल.या हटके जुगाडचा वापर करुन तुम्ही खराब झालेल्या कात्रीचा पुन्हा उपयोग करू शकता आणि पैसे वाचवू शकता.

हेही वाचा : तुम्ही कधी उलट चालण्याचा प्रयत्न केला आहे? उलट चालण्याचे फायदे वाचाल तर अवाक् व्हाल

Avika Rawat Foods या युट्यूब अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “कात्रीला चहा पावडरमध्ये टाकताच कमाल झाली. खूप महत्त्वाचा व्हिडीओ नक्की पाहा” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप छान माहिती” तर एका युजरने लिहिलेय, “ही ट्रिक खरंच खूप उपयोगाची आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “तुमचे खरंच खूप आभार. तुम्ही नेहमी खूप चांगल्या टिप्स सांगता”

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kitchen hacks in marathi easy remedies to remove rust and stains on scissors watch kitchen jugaad video viral ndj