स्वयंपाक घरात वस्तू ठेवण्यासाठी वापरले जाणारे किंवा कामावर जाताना अन्नपदार्थ घेऊन जाण्यासाठी वापरले जाणारे प्लास्टिकचे डबे, बाटल्या यांच्यावर असणारे स्टिकर, कधी आपण एकदाचे काढून मोकळे होतो; असे अनेकांना वाटत असते. खरंतर त्यामागे विशेष असं काहीच कारण नसतं, मात्र तरीही बसल्या-बसल्या डब्यावरचा स्टिकर आपण नकळत नखाने काढण्याचा प्रयत्न करतो… मात्र असं करता-करता स्टिकर अर्धवटपणे निघून आपल्या हातात येतो. इतकाच नाही तर स्टीकरचा राहिलेला अर्धा भाग डब्यावर तसाच चिकटून राहतो.

आता तो काढण्यासाठी पुन्हा तुम्ही नखांचा वापर करता मात्र तो काही केल्या निघत नाही. उलट तुमच्याच नखांना त्या स्टिकरचा गम लागून राहतो. अशावेळेस आपली चिडचिड होते आणि विनाकारण तो स्टिकर काढायच्या नादी लागलो असे वाटू लागते. तुमच्यासोबतही कधी असे झाले असेल आणि तुम्हाला अगदी सहजतेने त्या डब्या-बाटल्यांवरचे स्टिकर काढून टाकायचे असतील, तर या सोप्या पाच टिप्स पाहा.

, दिवाळी साफसफाई
“हरे राम हरे राम, घरचे करा तुम्ही काम” दिवाळीच्या सफाईवर तरुणांनी गायले वऱ्हाडी रॅप, चिमुकलीने केला भन्नाट डान्स, Video बघाच
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Indian jugad To Stop Footwear Theft In The Temple Use This Unique Trick Desi Jugaad Video
VIDEO: मंदिरात किंवा गर्दीच्या ठिकाणी तुमचीही चप्पल चोरीला जाते का? मग हा जुगाड कराच, कधीच चप्पल चोरी होणार नाही
Aloo Bhujia Recipe
आलू भुजिया बनवण्याची सोपी रेसिपी नक्की ट्राय करा; वाचा साहित्य आणि कृती
students revealing the contents of their lunch boxes
Viral Video: ‘जिलेबी देणाऱ्या आईला भेटायचंय…’ चिमुकल्यांच्या डब्यातील पदार्थ पाहून तुम्हीही व्हाल थक्क; म्हणाल, ‘आमच्या वेळी…
Make malpuwa at home
घरच्या घरी ‘या’ सोप्या पद्धतीने बनवा मालपुवा; वाचा साहित्य आणि कृती
puri making tips
सणासुदीला टुमदार, लुसलुशीत पुरी बनवायची आहे? ‘या’ महत्त्वाच्या टिप्स करा फॉलो
How exactly does insulin work hldc
Health Special: इन्सुलिनचं कार्य नेमकं कसं चालतं?

हेही वाचा : स्वयंपाकघरात एकही झुरळ दिसणार नाही; घरातील उदबत्त्या अन् कापूर करतील तुमची मदत! पाहा ही सोपी हॅक….

१. साबणाचे पाणी

अनेकदा तुम्ही पाहिलं असेल कि, भांडी घासताना जर स्टिकर काढण्याचा प्रयत्न केला तर ते अगदी सहज निघून जातात. याचे कारण म्हणजे साबणाचे पाणी. गरम पाण्यामध्ये काही थेंब लिक्विड साबणाचे टाकून त्यामध्ये डबे बाटल्या काही वेळासाठी बुडवून ठेवा. किंवा गरम पाण्यात लिक्विड साबण घालून ते सरळ डब्यांवरील स्टिकरवर ओता आणि काहीवेळ तसेच राहू द्या. दोन्ही पद्धतीत, पाण्याचे गरम तापमान आणि साबण यांमुळे तुम्हाला अगदी काही सेकंदात आणि कुठल्याही प्रकारचा चिकटपणा मागे न राहता स्टिकर काढण्यास मदत होऊ शकते.

२. बेकिंग सोडा आणि तेल

सगळ्यांनाच माहित आहे अन्नपदार्थांपेक्षा बेकिंग सोड्याचा वापर आपण आपले स्वयंपाकघर लक्ख ठेवण्यास अधिक करत असतो. इथेही तो तुमची मदत करेल. तुमच्या डब्यांवरील चिकट लेबल्स आणि स्टिकर्स काढून टाकण्यासाठी तेल आणि बेकिंग सोडा सम प्रमाणात मिसळून घ्या. हे मिश्रण डब्यांवरील लेबल्सना लावून काही वेळ तसेच ठेवा, नंतर डबे घासून पाण्याने धुवून घ्या.

३. हेअर ड्रायरचा वापर

केसांसाठी वापरला जाणारा हेअर ड्रायर, तुमच्या डब्यावरील चिकट स्टिकर्स काढण्यासाठी खूप मदत करू शकतो. हे कसं शक्य आहे? असा प्रश्न पडला असेल तर, तुमच्या हेअर ड्रायरचे उच्चतम तापमान सेट करा आणि डब्यावरील लेबलवर वापरा. त्या ड्रायरच्या गरम हवेमुळे, लेबल/स्टिकरचा गम निघून जाऊन स्टिकर आपोआप सुटून येईल.

४. व्हाईट व्हिनेगर

बेकिंग सोड्याप्रमाणेच व्हिनेगरदेखील या प्रकरणात तुमची मदत करू शकतो. यासाठी पाण्यात, व्हिनेगर घालून त्यामध्ये लेबल/स्टिकर असणारे झाकणं आणि डबे टाकून ३० मिनिटे तसेच ठेऊन द्या. यानंतर गार पाण्याखाली सर्व डबे आणि झाकणं धुवून घ्या.

५. नेल-पॉलिश रिमूव्हर

नखांवरील रंग काढून टाकण्यासाठी ज्या नेलपेंट रिमूव्हरचा तुम्ही वापर करता तेच तुमच्या डब्यांवरील स्टिकर/लेबल्स काढून टाकण्यास उपयुक्त ठरू शकते. यासाठी सुरवातीला तुम्हाला जमेल तितके तो स्टिकर हाताने काढून टाका. आता उरलेल्या स्टिकर आणि गमसाठी नेलपेंट रिमूव्हरचा वापर करा. मात्र ही ट्रिक केवळ काचेच्या वस्तूंवर वापरावी. प्लास्टिकच्या डब्यावर वापरल्यास त्यांचा रंग निघून जाण्याची शक्यता असते. अशी माहिती एनडीटीव्हीच्या एका लेखावरून समजते.