भाजीपाला हा आपल्या आहारातील मुख्य घटक आहे कारण त्यामध्ये अनेक पोष्टिक मुल्य असतात जे आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. भाज्या दिर्घकाळासाठी ताज्या ठेवणे हे आपल्यापैकी अनेकांसाठी एक मोठे आव्हान ठरू शकते विशेषत: जेव्हा आपण त्या जास्त प्रमणात खरेदी करतो तेव्हा. आपल्याला माहितच आहे की, भाज्या उपटल्यानंतर किंवा तोडल्यानंतप खूप पटकन त्या खराब होऊ शकतात. पण जर तुम्ही त्या योग्य रितीने साठवून ठेवल्या तर त्यांचे आयुष्य वाढू शकते आणि त्या जास्त काळ ताज्या राहू शकतात. योग्य रितीने भाज्या साठवण्याच्या पद्धती वापरल्यास तुमच्या भाज्या साधारण आठवडाभर टिकू शकतात. आम्ही तुम्हाला काही टिप्स दिल्या आहेत ज्या वापरून तुम्ही आठवडाभर भाज्या ताज्या ठेवू शकता.
आठवडाभर भाज्या ताज्या ठेवण्यासाठी फॉलो करा ६ टिप्स
१. भाज्या फक्त वापरण्यापूर्वी धूवा
बरेच लोक भाज्या घरी आणल्यानंतर लगेच धुण्यास प्राधान्य देतात, परंतु योग्य नाही. कारण पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर भाज्या लगेच वापरल्या नाही तर त्या लवकर खराब होऊ शकतात. भाज्या वापरण्यापूर्वीच धुणे शहाणपणाचे आहे, यामुळे त्यांचे आयुष्य वाढेल वाढेल. भाज्या कोरड्या असतील तरच त्या ताज्या राहतात.
हेही वाचा – तुम्हाला मध्यरात्री भुक लागते का? मग, पोषणतज्ज्ञांनी सांगितलेले ‘हे’ पाच हेल्दी पदार्थ खा
२. भाझ्या कोरड्या ठेवा
ओलाव्यामुळे भाज्या लवकर नासू शकतात त्यामुळे त्यांना कोरडे ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते. जेव्हा आपण भाज्या रेफ्रिजेटरमध्ये ठेवतो तेव्हा त्या कापडाने किंवा कागदाने गुंडाळून ठेवा, जेणेकरून त्या कोरड्या राहतील. जर तुम्ही ही गोष्ट विसरलात तर तुमच्या भाज्या लवकर खराब होऊ शकतात.
३. योग्य ठिकाणी भाज्या ठेवा
भाज्या साठवताना प्रत्येक भाजीसाठी वेगवेगळी पद्धत वापरली जाते म्हणून कोणत्या भाज्या फ्रिजमध्ये ठेवाव्यात आणि कोणत्या ठेवू नयेत हे तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे. पालक, मेथी सारख्या पालेभाज्या फ्रिजमध्ये रेफ्रिजेट ड्रॉवरमध्ये ठेवाव्या तर बटाटे, बीट, कांदे हे अंधार असलेल्या ठिकाणी साठवून ठेवू शकता.
४. गरज असेल तेव्हाच भाज्या कापा
जेव्हा भाज्या कापल्या जातात तेव्हा त्या लवकर खराब होऊ शकतात कारण त्या हवेच्या संपर्कात येतात. त्यामुळे भाज्यांचा ताजेपणा टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही जेव्हा भाज्या वापरणार असाल तेव्हा त्यांना कापा. जर कापलेल्या भाज्या शिल्लक राहिल्या असतील तर त्या हवाबंद डब्यात ठेवून रेफ्रेजेरेटरमध्ये ठेवा.
हेही वाचा – लोखंडी कढईत चुकनही बनवू नका हे ५ पदार्थ!
५. भाज्या नियमित तपासा
तुम्ही योग्य पद्धतीने भाज्या साठवल्या तरीही खराब होऊ शकतात त्यामुळे भाज्या चांगल्या आहेत का हे नियमितपण तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भाज्या खराब झाल्याची लक्षणे दिसतायेत का ते पाहा. भाज्यांचा रंग बदलला आहे का, खराब वास येत आहे का किंवा मऊ झाल्या आहेत का ते तपासा. जर तुम्हाला भाज्या खराब झाल्याची लक्षणे दिसत असतील तर तुम्ही त्यांची लगेच वापरून टाका किंवा त्याची योग्य विल्हेवाट लावा कारण त्यामुळे इतर भाज्या देखील खराब होऊ शकतात.
६. भाज्या प्रिजर्व्ह करून ठेवा
भाज्या प्रिजर्व्ह करुन ठेवण्याच्या अनेक पद्धती आहेत जेणेकरून त्या ताज्या राहतील. कॉर्न, वाटाना सारख्या भाज्यांचे फ्रिजिंग करणे हे प्रिजर्व्ह करण्याच्या सर्वोत्तम पद्धतींपैकी एक आहे. प्रिजर्व्ह करण्यापूर्वी भाज्या सुकेलल्या नाही ना याची खात्री करा कारण त्यांना फ्रिंझिंगंमुळे त्यांचा रंग आणि पोत टिकण्यास मदत होते.
तुम्हाला या टीप्स उपयोगी ठरल्या का? आम्हाला नक्की कळवा