Kitchen Jugaad : एक काळ असा होता की, गृहिणी स्वयंपाकघरात माती, स्टील, पितळ, तांबे आणि लोखंडाच्या भांड्यांमध्ये जेवण बनवायच्या. पण, आता याच भांड्यांची जागा नॉन स्टीक भांड्यांनी घेतली आहे. हल्ली अनेकांच्या स्वयंपाकघरात नॉन स्टीक पॅनचा वापर केला जातो. डोसे, चपाती बनवण्यासाठी या नॉन स्टीक पॅनचा वापर केला जातो. आपल्या नॉर्मल तव्यावर चपाती, डोसे बनवताना ते तव्याला चिकटतात. पण, नॉन स्टीक पॅनवर तसे होत नाही, त्यामुळे तुम्ही त्यावर आरामात चपाती शेकू शकता. नॉन स्टीक पॅन वापरणे सहजसोप्पे असले तरी काही दिवसांनी त्यावरील ब्लॉक कोटिंग निघू लागते. अशा पॅनवर कोणताच पदार्थ नीट बनतदेखील नाही. अशावेळी तो नॉन स्टीक पॅन फेकून दिला जातो. पण, तुम्ही असे करत असाल तर थांबा, कारण आज आम्ही तुम्हाला कोटिंग निघालेल्या नॉन स्टीक पॅनचा वापर पुन्हा कशाप्रकारे करायचा याच्या काही ट्रिक्स सांगणार आहोत.

कोटिंग निघालेल्या नॉन स्टीक पॅनचा असा करा पुन्हा वापर

१) सर्व्हिंग ट्रे बनवा

तुमच्याकडेही नॉन स्टीक पॅन असेल आणि तो जुना झाला असेल किंवा त्यावरील कोटिंग निघाले असेल, तर तुम्ही त्याचा पुन्हा सर्व्हिंग ट्रे म्हणून वापरू शकता. सर्व्हिंग ट्रे म्हणून वापर करण्यासाठी नॉन स्टीक पॅन आधी पूर्णपणे स्वच्छ करा, पुसून घ्या आणि त्यावर पेंट करा. पक्क्या पेंटने पेंट केल्यानंतर त्यावर तुम्ही आवडीचे डिझाइन बनवा. अशाप्रकारे पेंटिंग सुकल्यानंतर जेवण देण्यासाठी म्हणून त्याचा सर्व्हिंग ट्रे म्हणून वापर करू शकता.

Tomato soup in winter is good for health Tomato soup recipe in marathi
हॉटेलसारखं परफेक्ट टोमॅटो सूप १० मिनीटांत होईल तयार; थंडीत गरमागरम सूप करा एन्जॉय, सोपी रेसिपी
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
paneer popcorn recipe
Paneer Popcorn Recipe: पनीर लव्हर्स, ‘ही’ नवीकोरी रेसिपी लगेच करा ट्राय! एकदा खाल, तर पॉपकॉर्नची खरी चव विसराल
Jaggery Makhana recipe
उपवासाच्या दिवशी आवर्जून बनवा गूळ मखाणा; एकदम सोपी रेसिपी
benefits of eating saunf before bed
रात्रभर झोप लागत नाही? झोपण्यापूर्वी ‘हे’ खा; शांत झोप लागेल अन् तणावही होईल दूर
Bread Pizza Toast Recipe
नाश्त्यासाठी ट्राय करा ‘ब्रेड पिझ्झा टोस्ट’ रेसिपी, लगेच लिहून घ्या साहित्य आणि कृती
Salman Khan
‘दबंग’ रिलोडेड लाइव्ह कॉन्सर्टसाठी सलमान खान सज्ज; म्हणाला, “स्टेजवर जाण्याआधी कपडे…”
potato burger recipe
Potato Burger Recipe: बर्गरची ही नवीकोरी रेसिपी लगेच करा ट्राय! वाचा साहित्य आणि कृती

२) किचन ऑर्गनायझर बनवा

तुम्ही किचन ऑर्गनायझर म्हणून नॉन स्टीक पॅनदेखील वापरू शकता. पॅन स्वच्छ केल्यानंतर तुम्ही स्वयंपाकघरातील लहान भांडी जसे की काटा, चमचा आणि वाटी आणि इतर गोष्टी त्यात ठेवू शकता.

Read More News On Health : Vinesh Phogat : पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना वजन कमी करणे अधिक कठीण का असते? आहारतज्ज्ञ काय सांगतात? वाचा…

३) ग्रिलिंग किंवा भाजण्यासाठी करा वापर

डाळी किंवा चणे, शेंगदाणे भाजण्यासाठी तुम्ही जुन्या नॉन स्टीक पॅनचा वापर करू शकता. याशिवाय इतर कोणतेही कोरडे पदार्थ भाजण्यासाठी तुम्ही हा खराब नॉन स्टीक पॅन वापरू शकता.

४) बेकिंगसाठी वापरा

केक, कुकीज आणि कपकेक बनवण्यासाठी लोक अनेकदा कुकर वापरतात. अशावेळी तुम्ही नॉन स्टीक पॅनमध्ये मीठ किंवा वाळू घालून केक बनवू शकता, तो गरम करून त्यावर बेकिंग ट्रे ठेवू शकता.

Story img Loader