Kitchen Jugaad : चहा हा भारतीयांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. आपल्या देशात दिवसाची सुरुवात एक कप चहाने होते. अनेक जण दिवसातून दोन ते तीन वेळा चहा पितात. दररोज आपण चहा गाळून पितो. त्यामुळे चहा गाळणी चहापत्तीमुळे काळी पडते. काळी पडलेली चहा गाळणी कशी स्वच्छ करावी? हा खूप मोठा प्रश्न पडतो. अनेकदा आपण चहा गाळणी काळी पडली तर दुसरी चहा गाळणी खरेदी करतो पण आज आपण चहा गाळणी स्वच्छ करण्याची एक भन्नाट ट्रिक जाणून घेणार आहोत. या ट्रिकच्या मदतीने चहागाळणी नव्यासारखी दिसेल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (Kitchen Jugaad how to clean tea strainer at home video goes viral on social media)

हेही वाचा : Amla Health Benefits : रोज आवळ्याचा रस पिणे त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर ठरू शकतो का? सोनम बाजवाने सांगितलं रहस्य; पण तज्ज्ञांची मते काय?

Mooli ka raita recipe how to make muli ka raita mulyachi koshimbir recipe in marathi
हिवाळ्यात हा चटकदार पदार्थ खायलाच हवा, जेवण होईल चवदार; मुळ्याचे रायते कसे करायचे जाणून घ्या
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Pune Video
पुणेकराने बनवली फॅन्सी ऑटोरिक्षा; तुम्ही कधी या रॉयल ऑटोरिक्षामध्ये प्रवास केला का? VIDEO एकदा पाहाच
How To Make Matar Kachori At Home Matar Kachori recipe in marathi
थंडीत बनवा क्रिस्पी चटपटी मटर कचोरी! चहासोबत खासच लागते मटार कचोरी; नक्की ट्राय करा सोपी रेसिपी
Ragi Biscuits recipe
मैद्याचे बिस्किट सोडा मुलांसाठी घरीच बनवा पौष्टिक नाचणीचे बिस्कीट; वाचा साहित्य आणि रेसिपी
how to clean tea strainer
काळी पडलेली चहाची गाळणी झटपट करा स्वच्छ; वाचा ‘या’ सोप्या टिप्स
Gajar Rabdi Recipe,
थंडीच्या दिवसात बनवा गरमागरम ‘गाजर रबडी’, रेसिपी वाचूनच तोंडाला सुटेल पाणी, लिहून घ्या सोपी साहित्य आणि कृती
girlfriend boyfriend conversation selfie
हास्यतरंग :  चल एक…

भन्नाट ट्रिक वापरून करा चहागाळणी स्वच्छ

या व्हायरल व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे –

सुरुवातीला एक खराब चहागाळणी घ्या आणि त्यावर ENO पावडर टाका.
त्यानंतर त्यावर लिंबूचा रस पिळा.
दहा मिनिटानंतर त्यावर डिश वॉश लिक्विड टाका
खराब झालेल्या टूथब्रशनी चहागाळणी नीट घासा.
काळी पडलेली चहागाळणी नव्यासारखी दिसेल.
ही भन्नाट ट्रिक पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : Methanol Poisoning : मिथेनॉल विषबाधा म्हणजे काय? मद्यपानामुळे विषबाधा होऊ शकते का? जाणून घ्या तज्ज्ञांकडून….

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

हेही वाचा : रात्री अंथरुणात पडल्यानंतर झोप येत नाही; तणाव, थकवा जाणवतोय? मग झोपण्यापूर्वी करा फक्त ‘हा’ एक उपाय, मिळेल आराम

artkala4u या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “चहा गाळणी स्वच्छ करा”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप चांगली ट्रिक आहे” तर एका युजरने लिहिलेय, “ही ट्रिक वापरण्यापेक्षा मी नवीन चहागाळणी खरेदी करणार.” एक युजर लिहितो, “भन्नाट ट्रिक आहे.”
यापूर्वी सुद्धा सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहे. त्या व्हिडीओमध्ये अनेक भन्नाट ट्रिक सांगितल्या आहेत. काही दिवसांपूर्वी असाच एक व्हिडीओ समोर आला होता. त्या व्हिडीओमध्ये काळे पडलेले चांदीचे दागिने कसे स्वच्छ करायचे, याविषयी भन्नाट ट्रिक सांगितली होती.

Story img Loader