Jugaad Video : अनेकांच्या घरी उंदरांचा सुळसुळाट पाहायला मिळतो. उंदीर हा विध्वंसक प्राणी आहे. उंदरे अनेक ठिकाणी सामानाची नासधूस करताना दिसून येतात.उंदारांना पळवण्यासाठी आपण वाट्टेल त्या ट्रिक फॉलो करतो पण काहीही फायदा होत नाही.तुमच्या घरात उंदरांमनी धुमाकूळ घातला आहे का? जर होत तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही तुम्हाला उंदराना पळवण्याचा एक सोपा जुगाड सांगणार आहोत.
अनेक जण उंदीर मारण्याचे औषधी आणतात पण अनेकदा उंदीर मारणे, किळसवाणे वाटते अशावेळी उंदरांना न मारता घराबाहेर हाकलण्याची ही ट्रिक तुमच्या फायद्याची ठरू शकते. आज आपण त्याविषयीच सविस्तर जाणून घेऊ या.
हिरवी मिरचीच्या मदतीने घरातून पळवा उंदीर
आपण हिरव्या मिरचीच्या मदतीने घरातून उंदीर पळवणार आहोत. त्यासाठी तुम्हाला चार हिरव्या मिरच्या घ्याव्या लागणार आहेत. या मिरच्या तिखट असाव्यात. एका प्लेटमध्ये बेसन घ्या. या बेसनमध्ये व्हिनेगर टाका आण बेसन भिजवून घ्या. जर तुमच्या घरी व्हिनेगर नसेल तर त्याऐवजी लिंबू घ्या. बेसनाची पेस्ट तयार होईल. त्यानंतर त्यात डिटर्जंट पावडर टाका. त्यानंतर तिखट हिरव्या मिरच्या बारीक करुन त्यात टाका. त्यानंतर ही पेस्ट जुन्या वृत्तपत्रावर लावावी.त्यानंतर हे वृत्तपत्राचे पाच सहा लहान गोळे तयार करा आणि हे गोळे पेस्टमध्ये बुडवून काही ठराविक ठिकाणी जिथे उंदरांचा सर्वात जास्त वावर आहे तिथे हे गोळे ठेवावे. हा अनोखा जुगाड घरातून उंदीर पळवण्यासाठी फायदेशीर ठरेल.
Avika Rawat Foods या युट्यूब अकाउंटवरुन या संदर्भात सविस्तर माहिती देणारा व्हिडीओ शेअर केलेला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “न मारता घरातून उंदरे पळवण्याचा घरगुती उपाय” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “तुम्ही खूप छान पद्धतीने समजावून सांगितले. तुमची ही ट्रिक नक्कीच फायदेशीर ठरेल.” तर एका युजरने लिहिलेय, “तुमची ही माहिती नक्कीच फायदेशीर ठरेल.” आणखी एका युजरने लिहिलेय, “या टिप्सची मला खरंच गरज होती”