Viral Video : पावसाळा सुरू झाला आणि पावसाळ्यात अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. मुलांच्या तब्येतीपासून तर धान्ये मसाले सुरक्षित कसे ठेवावे, इथपर्यंत. खरं तर पावसाळ्यात धान्याला किड लागण्याची जास्त भीती असते. अशावेळी धान्याला किड लागू नये म्हणून आपण वाट्टेल ते प्रयत्न करतो, पण याचा काहीही फायदा हो नाही. आज आपण एक हटके उपाय जाणून घेणार आहोत.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पावसाळ्यात धान्याला किड लागु नये म्हणून धान्य कसे साठवायचे, याविषयी सांगितले आहेत. आज आपण त्याविषयी जाणून घेऊ या. हा उपाय पाहून तुम्हीही थक्क व्हाल. (how to Keep Grains Safe During Monsoon_
व्हिडीओमध्ये सांगितल्याप्रमाणे –
- सुरुवातीला धान्य स्वच्छ चाळणीने चाळून घ्यावे.
- उन्हात हे धान्य वाळवावे.
- धान्य डब्यामध्ये ठेवत असाल किंवा कोठीमध्ये ठेवत असाल तर आधी डब्यामध्ये किंवा कोठीमध्ये दोन ते तीन वृत्तपत्रे ठेवावीत.
- त्यानंतर डब्यात सुरुवातीला थोडी धान्य टाकावी.
- त्यानंतर कडूलिंबाची पाने झिप लॉकच्या बॅगमध्ये टाकून झिपलॉकच्या बॅगेला छिद्रे करावी. जेणेकरून कडूलिंबाच्या पानाचा सुगंध डब्यामध्ये दरवळत राहील.
- त्यानंतर एका टिश्यू पेपरमध्ये खडेमीठ टाकून पुडी तयार करा आणि ही पुडी या धान्यामध्ये टाका.
- त्यानंतर त्या डब्यामध्ये पुन्हा उरलेले धान्य टाका.
- त्यानंतर वरती सुद्धा पुन्हा कडूलिंबाच्या पाने आणि खडेमीठ त्याचप्रमाणे ठेवायचेआहे. आणि शेवटी वृत्तपत्राने धान्ये झाकुन ठेवायचे आणि शेवटी डबा बंद करावा.
- पावसाळ्यात डबे खाली ठेवू नका. कारण पावसाळ्यात ओलावा निर्माण होत असतो आणि हा ओलावा डब्यापर्यंत पोहचतो. त्यामुळे धान्य खराब होते.
या व्हिडीओत सांगितलेल्या टिप्सच्या मदतीने तुम्ही घरच्या घरी पावसाळ्यात योग्य रित्या धान्य साठवू शकता ज्यामुळे तुमच्या धान्यांना किड लागणार नाही आणि तुम्ही सुरक्षित धान्य साठवू शकता.
पाहा व्हायरल व्हिडीओ
हेही वाचा : पूर्वीच्या स्त्रिया एवढ्या निरोगी कशा होत्या? दैनंदिन काम करताना ‘हे’ पाच आसन करीत, पाहा VIDEO
prajakta_salve_marathi या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पावसाळ्यात धान्याला किड लागु नये म्हणुन असे स्टोअर करा” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक लोकांना हा उपाय आवडला आहे. एका युजरने विचारलेय, “ताई तूरडाळला आणि मुगडाळला करू शकतो का हा उपाय?”