Viral Video : भाजीपाला ताजा राहावा, यासाठी आपण सहसा फ्रिजचा वापर करतो पण पूर्वी प्रत्येकाच्या घरी फ्रिज नव्हती तेव्हा काही जुगाड किंवा ट्रिक वापरून भाजीपाला ताजा ठेवला जात असे. कोथिंबीर ही अशी भाजी आहे जी खूप लवकर खराब होते आणि अनेकांना ताज्या कोथिंबीरचाच वापर करायला आवडते. आता घरोघरी फ्रिज असल्यामुळे कोथिंबीर ताजी राहते पण पूर्वी कोथिंबीर दोन ते तीन दिवस ताजी ठेवणे, हे खूप कठीण होते. अशावेळी काही जुगाडचा वापर केला जात असे.
सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कोथिंबीर २-३ दिवस ताजी ठेवण्यासाठी एक भन्नाट जुगाड सांगितला आहे. आज आपण त्या विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. (Kitchen Jugaad How to keep green coriander fresh for 2-3 days without a fridge video goes viral on social media)
हेही वाचा : मुलांव्यतिरिक्त पालकांनीही आपल्या स्क्रीन टाइमबद्दल जागरूक असायला हवं; त्यासाठी काय करायला हवं?
फ्रिज न वापरता २-३ दिवस कोथिंबीर अशी ठेवा हिरवीगार
या व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला सांगते, “जेव्हा फ्रिज नव्हती तेव्हा कोथिंबीर कशात ठेवायची, हा खूप मोठा विचार यायचा. मग मी काय करायचे.. कोथिंबीर शेतातील असो किंवा बाजारातली असो, ती स्वच्छ धुवून चांगली चिरून घ्यायची. बारीक चिरलेल्या कोथिंबीरमध्ये तेल घालायचे व नीट मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर ही कोथिंबीर एका स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवायची. यामुळे कोथिंबीर दोन-तीन दिवस हिरवीगार राहते.”
हा भन्नाट जुगाड पाहून कोणीही थक्क होईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
https://www.instagram.com/reel/DB_YEFNtGPU/?igsh=MW9qaHhpc3N4bTZyYQ%3D%3D
हेही वाचा : भेसळयुक्त कुंकवामुळे केस पांढरे होत आहेत? मग घरीच बनवा नैसर्गिक कुंकू; जाणून घ्या पद्धत…
ch.haya9582 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “व्वाह छान ताई मस्त खूप खूप छान” तर एका युजरने लिहिलेय, “तेलाचं लॉजिक काही समजलं नाही” आणखी एका युजरने लिहिलेय, “लयं भारी की व्हिडिओ” एक युजर लिहितो, “मी पाण्यामध्ये ठेवत होते आठ दिवस राहत होती” तर दुसरा युजर लिहितो, “छान ताई. मी करून पाहते ही ट्रिक” अनेक युजर्सना हा व्हिडीओ खूप आवडला आहे.