Kitchen Jugaad : सध्या पावसाळा सुरू झाला आहे. पावसाच्या या वातावरणात मका उकळून किंवा भाजून खायला अनेकांना आवडतो तर काही लोकांना मक्याची भेळ बनवून खायला आवडते. मक्यापासून अनेक पदार्थ बनवले जातात पण मक्यापासून नवनवीन पदार्थ बनवताना मका सोलून घ्यावा लागतो आणि अनेकांना मका सोलण्याचा त्रास येतो. तुम्हालाही मका सोलण्याचा कंटाळा येतो का? सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मका सोलण्याची हटके पद्धत सांगितली आहे. (Kitchen Jugaad how to remove corn seeds easily)

फक्त एका मिनिटांत काढा मक्याचे दाणे

या व्हायरल व्हिडीओमध्ये सांगितल्याप्रमाणे –

Funny video The Little Girl Requests Alexa To Use Abusive Language But She Receives A Funny Reply Video Goes Viral
VIDEO: “Alexa शिव्या दे ना…”, चिमुकलीच्या विनंतीवर अ‍ॅलेक्साने दिलं जबरदस्त उत्तर; ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Bull attacked a person while he was dancing in front of him viral video on social media
बैलाशी मस्ती आली अंगाशी! माणसाच्या ‘या’ कृत्यामुळे बैल पिसाळला, शिंगाने उडवलं अन्…, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय झालं?
dance in kolhapur on marathi song halagi tune
“एकदा वय निघून गेलं की हा आनंद नाही” हलगीच्या तालावर मित्रांनी धरला ठेका; VIDEO पाहून म्हणाल नादच खुळा…
Shocking video You have never seen such a theft clothes theft caught on cctv goes viral
Shocking video: अशी चोरी तुम्ही आजपर्यंत पाहिली नसेल; अख्ख कुटुंब येतं उभं राहतं अन्…VIDEO पाहून आत्ताच सावध व्हा
Leopard attacks Viral Video
‘त्याने लढून स्वतःचा जीव वाचवला…’ घराबाहेरच्या अंगणात बिबट्याने थेट श्वानावर केला हल्ला; VIDEO पाहून उडेल थरकाप
Shocking video Groom sehra catches fire during photoshoot wedding video goes viral
VIDEO:”काही क्षणांसाठी आयुष्याचा खेळ करु नका” नवरदेवाला ग्रँड एन्ट्री पडली महागात; थेट फेट्याला आग लागली अन् पुढच्याच क्षणी…
Python Eating Deer In 12 Second Omg Video Viral Shocking video
VIDEO: चपळता हरली! १२ सेकंदात गिळलं जिवंत हरीण, अजगराची थरारक शिकार पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

एक मका घ्यायचा आणि चाकू घ्यायचा.
कणीस मधील एक लाइन चाकूच्या साहाय्याने काढायची. फक्त एक लाइन काढायची.
एक लाइन काढल्यानंतर आपला जो अंगठा असतो त्याच्या साहाय्याने सर्व लाइन्स बाजूने ओढायच्या.
मका एका मिनिटात तुम्ही सोलू शकता.
या ट्रिक माहिती झाली की तुम्हाला कधीही मका सोलण्याचा कंटाळा येणार नाही. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : पावसाळ्यात गरमागरम भजी, पकोडे खाण्याची खूप इच्छा होते? तज्ञांनी दिलेल्या ‘या’ टिप्स लक्षात ठेवा; कुरकुरीत भज्या खाण्याचा आनंद घ्या

पाहा व्हायरल व्हिडीओ

prajakta_salve_marathi या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “मक्याचे कणीस सोलण्याची जबरदस्त ट्रिक” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “काही वेळ लागत नाही..उलटं मस्त सोलता सोलता मस्त खाल्ले पण जातात” तर एका युजरने लिहिलेय, “आणखी एक टीप. हा मका स्वच्छ धुवून कुकरमध्ये शिजवला तर सुरीने नीट कापता येईल.” आणखी एका युजरने लिहिलेय, “मस्त ट्रिक आहे.”

हेही वाचा : भारतात दिवसेंदिवस डेंग्यूची प्रकरणे का वाढतायत? काय आहेत यामागील कारणे; जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात…

प्राजक्ता साळवे या इन्स्टाग्राम आणि त्यांच्या युट्युब अकाउंटवर व्हिडीओच्या माध्यमातून अनेक हटके घरगुती उपाय सांगतात. त्यांच्या प्रत्येक व्हिडीओवर युजर्स लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात. हजारो लोक त्यांना इन्स्टाग्राम आणि युट्युबवर फॉलो करतात. यापूर्वी त्यांचे असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहे. कधी त्या स्वयंपाकघरातील ट्रिक्स सांगतात तर कधी घरगुती उपाय सांगतात. काही दिवसांपूर्वी त्यांचा एक व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला होता. जुन्या उरलेल्या साबणांपासून त्यांनी एक नवीन साबण कशी तयार करायची, याविषयी सांगितले होते.

Story img Loader