कढीपत्ता(Curry leaves) ज्या पदार्थांमध्ये वापरला जातो त्यांची चव वाढवितो. पण आरोग्यासाठी त्याचे अनेक फायदे देखील देतात. वजन कमी करणे आणि हृदयाच्या आरोग्याला चालना देण्यापासून ते सकाळी जाणवणारा थकवा आणि जंतूच्या संसर्गाशी लढा देण्यापर्यंत – त्याच्या फायद्यांची यादी मोठी आहे! प्रत्येक स्वयंपाक घरात कढीपत्ता हा हमखास वापरला जातो. काही लोक घरातच कडीपत्याची लागवड करतात तर काही लोक बाजारातून भरपूर कढीपत्ता आणून साठवतात पण, कढीपत्ता योग्य पद्दतीने न साठवल्यास खराब होऊ शकतो. म्हणूनच कढीपत्ता साठवण्याचा योग्य पद्धत येथे सांगितला आहे. हा भन्नाट किचन जुगाड वापरा आणि जास्त जास्त दिवस कढीपत्ता साठवा.
u
पद्धत पहिली
फ्रिजमध्ये कढीपत्तापत्ता जास्त दिवस कसा साठवावा
- एका भांड्यात पाणी घेऊन त्यात मिठ टाका.
- बाजारातून आणलेला कढीपत्ता तसाच मिठाच्या पाण्यात १० मिनिटे ठेवा जेणेकरून तो निर्जंतुक होईल.
- आता मिठाच्या पाण्यातून कढीपत्ता काढा आणि तो चाळणीत पाणी नितळण्यासाठी ठेवा.
- कढीपत्ता पूर्ण नितळून झाल्यावर कॉटनच्या कपड्यावर ठेवा आणि कपड्याने पुसुन घ्या. तासभर फॅन खाली ठेवा.
- कढीपत्ता सुकल्यानंतर त्याची पाने काढून घ्या.
- आता एका डब्यात आणि झाकणाला टिश्यूपेपर किंवा कपडा वापरा. त्यावर कढीपत्ता ठेवा आणि व्यवस्थित झाकण लावा. हा कढीपत्ता फ्रिजमध्ये ठेवू शकता.
- कागद दोन-तीन दिवसांनी ओला होऊ शकतो त्यामुळे तो ओला झाल्यास बदलावा लागेल, कापड ओले होत नाही ते ओलावा शोषून घेते त्यामुळे कापड बदलण्याची गरज भासत नाही.
- अशा पद्धतीने कढीपत्ता साठवल्यास २०-२५ दिवस साठवू शकता.
हेही वाचा – छोले कुल्चे, लसुण नान, पनीर सारखे पदार्थ खाल्यानंतर आपल्याला इतकी तहान का लागते?
दुसरी पद्धत
फ्रिजशिवाय कढीपत्ता जास्त दिवस कसा साठवावा
- एका ताटलीत पांढरा कागद किंवा टिश्यू पेपर ठेवा आणि त्यावर कढीपत्तापसरवा त्यावर आणखी एक कागद किंवा टिश्यू पेपर वापरून झाकुण ठेवा. दोन दिवस हा कढीपत्ता असाच राहू द्या. त्याला पाणी लागणार नाही याची काळजी घ्या.
- दोन दिवसांनी कढीपत्ता सुकला की, हवाबंद डब्यात कढीपत्ता भरून ठेवा. हा कढीपत्ता फ्रिजशिवाय २०-२५ दिवस टिकतो. कढीपत्ता वापल्यानंतर झाकण बंद करायला विसरू नका.
तिसरी पद्धत
- कढीपत्ता बाजारातून आणल्यानंतर न धुताच कागदात गुंडाळा आणि प्लास्टिकच्या पिशवीत ठेवा. जेव्हा वापरायचा असेल तेव्हाच धुवून मगच वापरा.
- पहिल्या दोन पद्धतीमध्ये कढीपत्ता आधी धुवून मग साठवला आहे तर तिसऱ्या पद्धती आधी न धुता साठवला आहे आणि वापरण्याआधी धुवावा.