स्वयंपाकघरात काम करताना स्वयंपाकासह स्वच्छतेची काळजी घ्यावी लागती. स्वयंपाक करताना गॅस शेगडी, किचन ओटा, किचन टाईल्स, गॅस जवळील भिंत किंवा खिडकी, खिडकीच्या काचा तेलकट होतात. त्या वेळीच साफ न केल्यास त्यावर तेलकट थर जमा होत राहतो आणि चिकटपणा जाणवतो. रोजच्या धावपळीत आपण वरचेवर गॅस आणि ओट्यावरून फडक फिरवून घेतो पण आठवड्यातून एकदा गॅस शेगडी आणि ओट्याची व्यवस्थित सफाई केली पाहिजे. तुम्हालाही तेलकट चिकट गॅस शेगडी अथवा ओटा साफ करायचा असेल तर एक सोपा उपाय येथे सुचवला आहे. तुम्हाला यासाठी फार कष्ट घ्यावे लागणार नाही. घरात उपलब्ध असलेल्या वस्तू वापरून तुम्ही गॅस आणि किचन ओटा स्वच्छ करू शकता.
गॅस शेगडी साफ करण्यासाठी कसे वापरावे लिंबू
तेलकट ओटा आणि गॅस शेगडी साफ करण्यासाठी एक लिंबू, एक चमचा खाण्याचा सोडा, एक चमचा मीठ आणि एक चमचा वॉशिक पावडर अथवा साबणाचे तुकडे एवढंच सामान लागेल. घरात सहज उपलब्ध होणाऱ्या या गोष्टी वापरून त्याचे मिश्रण तयार करायचे आहे जे वापरून तुम्ही गॅस शेगडीची आणि ओट्याची सफाई करू शकता. हे मिश्रण तयार करण्यासाठी फक्त ५ मिनिटे वेळ तुम्हाला द्यावा लागेल. एकदा हे मिश्रण तयार करू ठेवले की तुम्ही केव्हाही ते सफाईसाठी वापरू शकता. फक्त गॅस शेगडीच नाही तर किचन ओटा, किचन टाईल्स, तेलकट भिंती, तेलकट खिडक्या, तेलकट काचा साफ करण्यासाठी हे मिश्रण तयार करू शकता. चला तर मग जाणून घेऊ या हे मिश्रण.
हेही वाचा – उन्हाळ्यात पाण्यात चिमूटभर मीठ टाकून पिणे निर्जलीकरणाचा धोका टाळू शकते का? डॉक्टर काय सांगतात वाचा….
हेही वाचा – तुमच्यासमोर श्वास गुदमरल्याने एखादी व्यक्ती तडफडत असेल तर तुम्ही काय कराल? डॉक्टरांनी सांगितले हे महत्वाचे उपाय
गॅस शेगडी साफ करण्यासाठी घरगुती मिश्रण कसे तयार करावे?
एक तवा गरम करा त्यावर एक ग्लास पाणी ओतून पाणी गरम करा. आता या पाण्यात एक लिंबू पिळा, त्या एक चमचा खाण्याचा सोडा आणि एक चमचा मीठ टाका.त्यानंतर त्यात टाका एक चमचा वॉशिंग पावडर टाका. साबणाचे तुकडे वापरू शकता. व्हिनेगर असेल तर तेही यात टाका. सर्व मिश्रण उळून घ्या आणि एका भांड्यात काढा. तुम्हाला कढई किंवा तवा साफ करायाच असेल तर त्यात हे मिश्रण बनवू शकता. गरम तव्यावर अर्ध लिंबू घासून घ्या तवा व्यवस्थित साफ येईल. आता तयार मिश्रण एका बाटलीत भरून ठेवा. बाटलीच्या झाकणाला बीळ पाडा जेणे करून ते शिंपडता येईल. आता तेलकट झालेला गॅस, खिडकीच्या काचा किंवा किचन टाईल्स स्वच्छ करण्यासाठी हे मिश्रण उपयोगी ठरेल. हे मिश्रण शिंपडून तेलकट भिंत, ओटा, गॅस किंवा शेगडी घासून घ्या. आणि कापडाने साफ करा किंवा पाणी ओतून स्वच्छ करा. तेलकट गॅस किंवा ओटा चकचकीत होईल.