नारळ हा आपल्या रोजच्या आहारात वापरला जातो. अनेक लोक जेव्हा गरज असेल तेव्हाच नारळ आणतात कारण तो फोडल्यानंतर लगेच वापरावा लागतो. पण ऐनवेळी गरज पडली तर काही लोक घरात एखादा नारळ ठेवतात. पण काही वेळा घरात ठेवलेला नारळ खराब होतो किंवा त्याला कोंब फुटू लागतो. पण न फोडलेला नारळ ताजा ठेवण्याचा एक भन्नाट जुगाड तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर चला जाणून घेऊ या.

न फोडलेला नारळ ताजा ठेवण्याचा भन्नाट जुगाड

डिजिटल निर्माते शशांक आल्शी यांच्या मते, ” न फोडलला नारळ जास्त काळ ताजे ठेवायचा असाल एक सोपा उपाय आहे. तुम्हाला फक्त नारळ एखाद्या तांब्या किंवा वाटीवर सरळ ठेवायचा आहे जेणेकरून नारळाच्या आवरणावरील तीन ठिपके त्याच्या आतील पाण्याच्या संपर्कात येऊ नयेत ज्यामुळे ते अधिक काळ ताजे ठेवण्यास मदत करते,” या पोस्टला प्रतिसाद देताना, एका वापरकर्त्याने कमेंट केली “होय; मला माहित आहे आणि ते अनेक वर्षांपासून करत आहे…माझ्या आईने शिकवले आहे…”

Really last digit of your mobile number tell about your nature and personality
तुमच्या मोबाईलचा शेवटचा अंक खरंच सांगतो तुमचा स्वभाव? सोशल मीडियावर VIDEO चर्चेत
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
Man wrote message for his wife in back of the car video goes viral
किती ते प्रेम! नवऱ्यानं बायकोसाठी कारच्या मागे लिहला खास मेसेज; रस्त्यावर सर्व बघतच राहिले, VIDEO पाहून कराल कौतुक
The young women who boarded the AC local without tickets were released by the TC know the reason behind
“एसी लोकलमध्ये दिसली माणुसकी” पोलीस भरतीसाठी आलेल्या दोन तरुणींचा VIDEO होतोय व्हायरल
Puneri pati viral for parking in his spot funny puneri pati goes viral
PHOTO: पुणेकरांचा नाद नाय! गेट समोर गाडी पार्क करणाऱ्यांना आकर्षक बक्षिसे; शेवटचं बक्षिस वाचून पोट धरुन हसाल
Amruta Fadnavis
Amruta Fadnavis : शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “त्यापेक्षाही मोठा पुतळा…”
Jugaad Video | do you know best trick to thread a needle
Jugaad Video : सुई मध्ये दोरा ओवण्याची अनोखी ट्रिक, एकदा हा जुगाड पाहाच, Video Viral

या दाव्याबाबत पोषण तज्ज्ञांकडून जाणून घेतले. नारळ पाणी आणि खोबरे साठवण्याचा सर्वोत्तम मार्ग देखील जाणून घ्यायचा होता.

या टिप्सबाबत सहमती दर्शवताना चेन्नईतील टी नगर येथील क्लाउडनाईन ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सच्या कार्यकारी पोषणतज्ज्ञ, हरिप्रिया. एन यांनी सांगितले की, “एखाद्याने नारळाला इथिलीन-उत्पादक फळांपासून (केळी आणि सफरचंद यांसारख्या) दूर ठेवावे जे खराब होण्यास गती देऊ शकतात. “कोंब वाढू नये म्हणून कोरड्या वातावरणात साठवा,” असे हरिप्रिया यांनी सुचवले.

हेही वाचा – दह्यात दालचिनी पावडर टाकून त्याचे सेवन करावे का? जाणून घ्या त्याचे अनेक फायदे आणि काही तोटे

नारळाचा स्वयंपाकात कसा होतो वापर

ओले खोबरे: स्मूदी, कच्चे मिष्टान्न, सॅलड्स आणि उष्णकटिबंधीय पदार्थांसाठी(tropical dishes) ओले खोबरे आदर्श ठरते. हे खोबरे मऊ असते आणि मिसळण्यास किंवा चघळण्यास सोपे असते,

सुके खोबरे: बेकिंग, स्वयंपाक आणि खोबरेल तेल किंवा दूध बनवण्यासाठी उपयुक्त. “त्याची चव अधिक तीव्र आहे आणि शेल्फ लाइफ जास्त आहे, ज्यामुळे ते विविध पाककृतींसाठी अष्टपैलू ठरते.

नारळ पाणी कसे साठवावे

रेफ्रिजरेशन: ताजे नारळाचे पाणी २४-४८ तासांच्या आत प्यावे. “दीर्घकाळ साठवून ठेवण्यासाठी नारळी पाणी फोडल्यानंतर ताबडतोब हवाबंद कंटेनरमध्ये ठेवा. साधारण एका आठवड्यापर्यंत वापरू शकता.”

फ्रीझिंग: जास्त काळ साठवण्यासाठी नारळाचे पाण्याचे आइस क्यूब ट्रे किंवा फ्रीजर-सेफ कंटेनरमध्ये गोठवा. हे फ्रीजरमध्ये कित्येक महिने टिकू शकते.

हे कसे कार्य करते: “रेफ्रिजरेशन आणि फ्रीझिंग दोन्हीमुळे सूक्ष्मजीवांची वाढ कमी होते”

लक्षात ठेवा

*दूषित होऊ नये म्हणून नेहमी स्वच्छ, हवाबंद कंटेनर वापरा.

*ताजे नारळपाणी ओळखण्यासाठी कंटेनरला तारखांसह लेबल लावा.

हेही वाचा – अभिनेता मोहसिन खानला २०२३ मध्ये आला होता हृदयविकाराचा झटका, फॅटी लिव्हरचे निदान; हृदयविकार आणि फॅटी लिव्हरचा काय आहे संबध?

ओले खोबरे कसे साठवावे?

रेफ्रिजरेशन: ताजे खोबरे एका आठवड्यापर्यंत रेफ्रिजरेटरमध्ये ठेवता येते. खोबरे कोरडे होऊ नये म्हणून हवाबंद कंटेनरमध्ये ठेवा.

फ्रीझिंग: ओले खोबरे ६-८ महिन्यांपर्यंत टिकवण्यासाठी गोठवले जाऊ शकते. खोबऱ्याचे तुकडे करा किंवा चिरून घ्या आणि फ्रिझर बॅग किंवा हवाबंद कंटेनरमध्ये ठेवा.

हे कसे कार्य करते: रेफ्रिजरेशन खराब होण्याचा वेग कमी करते, तर गोठवल्याने ते जवळजवळ पूर्णपणे थांबते.

लक्षात ठेवा

* ओले खोबरे साठवण्यापूर्वी फडक्याने कोरडे करा

*स्टोरेज कंटेनरला लेबल आणि तारीख द्या.