Kitchen tips for kadhai oil stains: अनेकदा आपण किचनमध्ये नवनवीन पदार्थ ट्राय करत असतो. काही पदार्थांमध्ये जास्त तेल वापरावं लागतं म्हणून लोक सर्रास तेल वापरतात किंवा सतत एकाच भांड्यात मुख्यत: कढईत वारंवार विविध पदार्थ ट्राय करतात, त्यामुळे भांड्याला तेलाचे चिकट डाग तसेच राहतात आणि कितीही स्वच्छ केले तरी ते काही केल्या जात नाहीत.
भांड्यावर लागलेले हे तेलाचे चिकट डाग साफ करायला खूप मेहनत करावी लागते आणि यामुळे खूप वेळही वाया जातो. अनेकदा घरातच आपण वेगवेगळ्या पद्धती ट्राय करून बघतो, पण कशाचा काहीच फायदा होताना आपल्याला दिसत नाही. महागडे भांड्यांचे साबण, लिक्वीड अशा अनेक गोष्टी ट्राय करूनही आपल्याला हवा तो परिणाम दिसत नाही. पण, अशा परिस्थितीत खरंतर तुम्ही घरच्याघरी अगदी सोप्या पद्धतीने काही टीप्स फॉलो करून आणि अधिक मेहनत न घेता भांड्यांवरील तेलाचे चिकट डाग कायमचे नाहीसे करू शकता.
गरम पाणी आणि साबण
गरम पाण्यात भांडी घासायचा साबण मिसळल्यानंतर त्या पाण्यात काही वेळ या तेलकट भांड्याला भिजवत ठेवा. त्यानंतर काथ्याने किंवा स्पंजने चांगल्या प्रकारे ते भांडं घासून घ्या आणि धुवून टाका.
बेकिंग सोडा
बेकिंग सोड्याची पेस्ट या तेलकट डागांवर लावून सोडून द्या, त्यानंतर स्पंज किंवा काथ्याने ते भांडं स्वच्छपणे घासा आणि धुवून घ्या.
व्हिनेगर
व्हिनेगर आणि पाण्याला समप्रमाणात मिसळा आणि या मिश्रणाने तुमचं चिकट झालेलं भांडं स्वच्छ करून घ्या.
लिंबाचा रस
लिंबाचा रस थेट चिकट डागांवर लावा आणि १०-१५ मिनिटं भांडं तसंच ठेवा , मग ते पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
कॉर्नस्टार्च किंवा मैदा
या चिकट डागांवर मैदा शिंपडा आणि थोड्या वेळासाठी ते तसंच ठेवा. त्यानंतर भांडी घासायच्या काथ्याने ते साफ करा आणि धुवून टाका.
दरम्यान, या किचन जुगाडमुळे नक्कीच गृहिणींचा थोडा त्रास कमी होईल आणि यापुढे तेलकट भांडीही स्वच्छ राहतील.
हेही वाचा… नारळाची साल फेकताय? थांबा! नारळाच्या सालीपासून आरोग्याला होणारे ‘हे’ ६ फायदे एकदा पाहाच
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. लोकसत्ता संकेतस्थळ या गोष्टींची पुष्टी करत नाही.
© IE Online Media Services (P) Ltd