कितीही स्वच्छता केली तरी घरात अस्वच्छता नेहमी होत असते. त्यामुळे रोज आपल्याला साफ सफाई करावी लागते. वेळीच स्वच्छता नाही केली तर घरात किडे-मुंग्या होत असतात. स्वयंपाकघरात थोडीशी साखर जरी सांडली आणि ती लगेच साफ नाही केली तर मुंग्याची रांग लागते. मुंग्या एकदा घरात आल्या की पटकन जात नाही.अनेकदा काळ्या आणि लाल दोन्ही मुंग्या घरात दिसतात. लाल मुंग्या चावतात हे आपल्याला माहित आहे. घरात लहान मुले असतील तर त्याचा त्यांना जास्त त्रास होऊ शकतो. त्यामुळे मुंग्यांपासून सुटका मिळवण्यासाठी अनेक उपाय करतो. काही सांडले तर पटकन उचलतो, झाडून घेतो, पुसून घेतो तरीही अनेकदा मुंग्या होतातच.
तुम्ही जर नीट पाहिलं असेल तर झाडूच्या आसपास देखील मुंग्या असतात. काही वेळा चिकट पदार्थ झाडूला लागतात त्यामुळेही झाडूला मुंग्या लागतात. अनेकदा झाडताना या मुंग्या आपल्याला हाताला किंवा पायाला चावतात. तुम्हालाही अशी समस्या कधीही जाणवली असेल त्यासाठी आमच्याकडे एक उपाय आहे. तुम्हाला सोपा घरगुती उपाय सांगणार आहोत ज्यामुळे मुंग्यापासून सुटका मिळेल.
हळद ही अत्यंत गुणकारी आहे हे तुम्हाला माहीत आहे. हळदीचे फायदेही तुम्हाला माहीत असतील. हीच हळद तुम्हाला मुंग्यापासून सुटका मिळवून देण्यासाठी मदत करू शकते. युट्युबवर @IndianVloggerPinki नावाच्या चॅनेलवर झाडूला लागलेल्या मुंग्या काढण्यासाठीची सोपी ट्रिक सांगितली आहे.
हेही वाचा – Video : सफाई करण्याआधी झाडूला मोजे घाला अन्….; ‘ही’ भन्नाट ट्रिक करेल कमाल
व्हिडीओमध्ये दाखवले आहे की, एका प्लेटमध्ये अर्धा चमचा हळद घ्या, त्यात अर्धा चमचा टाल्कम पावडर टाका. दोन्ही एकत्र करू शकता. रात्री झोपण्यापूर्वी झाडूमध्ये ही हळद आणि पावडर टाकून ठेवा त्यातील मुंग्या निघून जातील कारण मुंग्याना हळदीचा वास सहन होत नाही.
घरात इतक कुठेही मुंग्या दिसत असतील तर तिथेही ही पावडर वापरू शकता.
हेही वाचा – गॅसवर लाटणे गरम करा अन् मग लाटा पोळ्या…पाहा हटके जुगाडची कमाल!
ही ट्रिक उपयूक्त आहे की नाही तुम्ही स्वत: वापरून ठरवा.