“हात फिरे तिथे लक्ष्मी वसे” असे वडिलधारी मंडळी नेहमी सांगतात. याचा अर्थ असा आहे की, जिथे स्वच्छता आहे तिथे लक्ष्मीचा वास असतो. सोप्या शब्दात सांगायचे जर तुमच्या घरात स्वच्छता असेल तर रोगराई पसरणार नाही. सर्वांचे आरोग्य चांगले राहील. जर आपले आरोग्य चांगल असेल तर आपले आयुष्य आपण आनंदाने जगू शकतो. वडीलधाऱ्यांची ही शिकवण आपण आजही पाळतो. आपल्याकडे सणासुदीला घराची स्वच्छता आवर्जून केली जाते. त्यामागे हेतू हाच असतो की आपल्या घरातील अस्वच्छता राहणार नाही आणि कोणीही आजारी पडणार नाही. घर स्वच्छ असेल तर घरातील वातावरणही प्रसन्न राहते. स्वच्छता किती महत्त्वाची आहे हे आपल्याला माहितच आहे पण स्वच्छता करणे कितीही आवश्यक असले तरी सोपे मात्र अजिबात नाही.
घराचा काना-कोपरा साफ करणे ही मोठी कसरतच आहे. सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये प्रत्येकाला वारंवार स्वच्छता करण्यासाठी वेळ नसतो. अशावेळी महिन्यातून एकदा सफाई केली तरी ती व्यवस्थित झाली पाहिजे इतकीच अपेक्षा असते. घराचा काना-कोपरा साफ करणे ही मोठी कसरतच आहे. त्यात आता जवळपास प्रत्येकाच्या घरात खूप पसरा असतो त्यातून कुठे कुठे धूळ मागे राहते. कुठे ना कुठे जाळ्या असतात ज्या सहजासहजी साफ करता येत नाही. काळजी करू नका तुमच्या या समस्येवर आम्ही उपाय सांगणार आहोत. तुम्हाला त्यासाठी फार कष्टही करावे लागणार नाही आणि झटपट सफाई देखील करता येईल अशी ट्रिक आम्ही सांगणार आहोत. तुम्हाला फार काही करायाचे नाही फक्त झाडूला मोजे घाला आणि घराची सफाई करा. तुम्हाला ऐकायला हे थोडे विचित्र वाटेल पण ही ट्रिक खरचं उपयुक्त ठरेल.
हेही वाचा – Video : रोज घर झाडल्यानंतर झाडूमधून फक्त सेफ्टी पिन फिरवा; मोठ्या समस्येतून होईल सुटका!
तुमच्या घरात फ्रिज, टिव्ही, वॉशिंग मशीन, कपाट, बेड, सोफा अशा अनेक मोठ्या मोठ्या वस्तू असतात ज्यांच्यामुळे सफाई करताना फार अडचण होते. अनेकदा कपाटाच्या मागे खूप धूळ साचते, फ्रिजमागे जाळ्या लागतात, बेड किंवा सोफ्या खाली धूळ साचलेली असते. अशा वेळी वेळी नुसता झाडू फिरवण्यापेक्षा जर तुम्ही झाडूला मोजे घालून सफाई केली तर खूप चांगली सफाई होईल. झाडूने सफाई करताना कोपऱ्यामधील धूळ निघत नाही आणि ओल्या फडक्याने पुसायचे म्हटले तर हात नीट पोहच नाही अशावेळी तुम्ही झाडूला मोजा घालून सफाई करू शकता. तुम्हाला फक्त एक ओला मोजा घ्या आणि झाडूला घाला आणि जिथे जिथे सफाई करायची आहे तेथून फिरवा. जी धूळ झाडूने निघत नाही ती सर्व धूळ ओल्या मोज्याने साफ कपता येईल. अगदी जाळ्या देखील सहज मोज्याला चिकटून साफ होतील.
हेही वाचा – गॅसवर लाटणे गरम करा अन् मग लाटा पोळ्या…पाहा हटके जुगाडची कमाल!
युट्युबर Avika Rawat Foods नावाच्या पेजवर ही ट्रिक सांगितली आहे. ही ट्रिक फायदेशीर आहे की नाही ते तुम्ही स्वत: वापरून पाहू शकता.