Kitchen Jugaad: झाडू ही एक अशी वस्तू आहे जी सर्वांच्याच घरात असते. प्रत्येक घरात स्वच्छतेसाठी झाडू वापरला जातो. साफसफाई करण्यासाठी नवनव्या वस्तू आल्या तरी आजही झाडू वापरला जातो. संपूर्ण घराची साफ-सफाई एकट्या झाडूने केली जाऊ शकते. पण तुम्ही कधी झाडूला टुथपेस्ट लावून पाहिली आहे का? झाडूला टुथपेस्ट लावण्याचा मोठा फायदा आहे. एका गृहिणीने हा जबरदस्त असा जुगाड दाखवला आहे. याचा परिणाम असा आहे की पाहूनच तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल. किचन जुगाडाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
झाडू आणि टुथपेस्ट तसा दोघांचाही एकमेकांशी काहीच संबंध नाही. पण जर का तुम्ही या दोघांचा हा उपाय एकदा पाहिला तर तो पुन्हा पुन्हा कराल, असे गृहिणीचे म्हणणे आहे. आता झाडूला टुथपेस्ट लावण्याचा काय फायदा आहे, हे पाहण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल. चला तर मग या व्हिडीओमध्ये काय आहे पाहुयात.
व्हिडीओत तुम्ही पाहाल तर गृहिणीने आधी टुथपेस्टचा खाली झालेला ट्युब घेतला आहे. मग गृहिणीने टुथपेस्ट ट्युबच्या खालाच्या टोकाला कात्रीने एक छिद्र पाडलं आहे. हा करण्यात आलेला छिद्र टुथपेस्टचा समोरचा भाग या छिद्रात जाईल, एवढा मोठा करावा लागणार आहे. आता एका झाडूला घेऊन गृहिनीने दांड्याच्या थोड्या अंतरावरील खालच्या बाजुला छिद्र करण्यात आलेला टुथपेस्ट ट्युब घेऊन झाडूच्या दांडूला गुंडाळलं आहे. टुथपेस्ट ट्युबच्या खालच्या भागात करण्यात आलेल्या छिद्रात गृहिनीने टुथपेस्ट ट्युबचा वरचा भाग घुसवला असून त्यावर ट्युबचा झाकण लावून दिलं आहे. यामुळे तुमचा झाडू लवकर खराब होणार नाही. झाडूवर टुथपेस्ट ट्युब लावल्याने तुम्हाला झाडूने छोट्या जागेतूनही सहज झाडता येईल. बेड, कपाटाखालून झाडताना झाडू विस्कटली जाते, तुटते असं होणार नाही. झाडू फार फुलणार नाही आणि अडकणार नाही, असे महिलेचे म्हणणे आहे. हा प्रयोग तुम्ही देखील करुन पाहू शकता.
(हे ही वाचा : Jugaad Video: महिलांनो, एकदा कढईमध्ये टूथपेस्टसह ‘हा’ एक पदार्थ घालून पाहा; परिणाम पाहून थक्क व्हाल )
येथे पाहा व्हिडिओ
maira amazing recipe & tips या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा जुगाड तुम्हीही नक्की ट्राय करुन पाहा आणि खरंच याचा फायदा तुम्हाला झाला का, हे आम्हाला कमेंट करुन कळवा.
(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या व्हिडीओवर आधारित आहे. लोकसत्ता याची पुष्टी करत नाही.)