Kitchen Jugaad Video: जवळपास प्रत्येक पूजेमध्ये अगरबत्ती, उदबत्ती व धूप जाळला जातो. पूजा मंदिरात असो वा घरात; प्रत्येक पूजेच्या वेळी अगरबत्ती लावली जातेच. हवा शुद्ध आणि मंगलमय करण्यासाठी पवित्र समारंभाचा एक आवश्यक भाग म्हणून अगरबत्तीचा वापर केला जातो. अगरबत्ती लावल्यानंतर पूजेदरम्यान वातावरण सुगंधित राहते आणि मग त्या सुगंधाने वातावरणात एक प्रकारे सकारात्मकता येते. मात्र, या अगरबत्ती चांगला सुगंध देणाऱ्या अन् मन प्रसन्न करणाऱ्या असल्या तरी त्यांचा बॉक्स रिकामा झाला की, आपण तो निरुपयोगी म्हणून बाहेर फेकून देतो. पण, हा रिकामा झालेला बाॅक्स तुमच्या खूप उपयोगाचा आहे हे अगरबत्तीच्या अशा रिकामा बॉक्सचा अनोखा असा वापर करून एका महिलेने दाखवून दिले आहे. त्या महिलेने एक भन्नाट जुगाड करून पावसाळ्यात होणाऱ्या एका मोठ्या त्रासदायक समस्येतून सुगंधी अगरबत्त्यांचा रिकामा बाॅक्स तुमची कशी सुटका करू शकतो हे स्पष्ट केले आहे. यासंबंधीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
गृहिणींकडे काही ना काही किचन जुगाड असतात. आता सोशल मीडियावर एका गृहिणीने किचन जुगाडाचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा अगरबत्त्यांच्या रिकाम्या बॉक्सचा जुगाड आहे. आता अगरबत्त्यांच्या रिकाम्या बॉक्सने तुम्हाला कोणता फायदा होणार याचाच तुम्ही विचार करीत आहात ना? मग हा जुगाड तुम्हाला पावसाळ्याच्या दिवसांत जाणवणाऱ्या समस्येवर मात करण्यास मदत करील. अगरबत्त्यांच्या रिकाम्या बॉक्सने होणारा फायदा पाहून तुम्ही थक्क होऊन जाल. एका गृहिणीने या जुगाडाचा शोध लावला असून, या अनोख्या जुगाडाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पाऊस जास्त पडू लागला की, हवाहवासा वाटणारा पाऊस महिलांना नकोसा वाटायला लागतो. कारण की, महिलांना घरातील सगळ्याच गोष्टी पाहाव्या लागतात. घरातल्या साफसफाईपासून घरातील लोकांच्या कपड्यांपर्यंत सगळ्या गोष्टी त्यांना टापटीप ठेवाव्या लागतात. पावसात भिजून आल्यानंतर आपले कपडे ओले असतात. ते कपडे आपण तसेच गोळा करून ठेवले, तर त्या कपड्यांना दुर्गंधी येण्यास सुरुवात होते. तसेच दमट, थंड वातावरणामुळे कितीही प्रयत्न केले तरी ओले कपडे लवकर सुकत नाहीत. त्यात माती-चिखलाचे डाग आणि रस्त्यावरील खराब पाणी यांमुळे कपडे खराब झालेले असतात. त्यामुळे पावसाळ्यात रोजच्या रोज कपडे धुण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. पण, हे ओले कपडे लवकर न वाळल्यामुळे काही वेळाने त्यांना कुबट वास यायला लागतो. या समस्येने अनेक जण हैराण झालेले असतात. आता याच समस्येवर महिलेने जबरदस्त उपाय सुचविला आहे. चला तर जाणून घेऊया नेमके तुम्हाला काय करायचे आहे.
(हे ही वाचा : तरुणपणातच तुमचे केस पांढरे होतायत का? नारळाच्या तेलात फक्त ‘या’ दोन गोष्टी मिसळा, नैसर्गिकरित्या होऊ शकतात काळे)
नेमके काय करायचे?
तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता की, महिलेने अगरबत्त्यांचा एक रिकामा बॉक्स घेतला आहे. तो मध्यभागी कापून त्याचे दोन भाग केले आहेत. अगरबत्त्यांच्या रिकाम्या बाॅक्सचे दोन तुकडे करून, महिलेने त्यांना नीट दुमडून ते कपड्यांच्या कपाटातील एका कोपऱ्यात ठेवले आहेत. हा वास वर्षभरही असाच टिकून राहू शकतो. अगरबत्त्यांच्या रिकाम्या बॉक्समधून बाहेर पडणाऱ्या सुगंधामुळे कपड्यांतील ओलाव्यामुळे पसरणारा कुबट वास जाणवणार नाही, असे या महिलेचे म्हणणे आहे.
येथे पाहा व्हिडीओ
Jaya’s Kitchen&health या यूट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा जुगाड तुम्हीही नक्की ट्राय करून पाहा आणि खरंच याचा फायदा तुम्हाला झाला का, हे आम्हाला कमेंट करून कळवा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या व्हिडीओवर आधारित आहे. लोकसत्ता याची पुष्टी करीत नाही.)