Kitchen Jugaad Video: दररोज दात स्वच्छ करण्यासाठी आपण प्रत्येकजण टूथपेस्टचा वापर करतो. आतापर्यंत टूथपेस्टचा वापर केवळ दात घासण्यासाठी केला जात असे. मात्र, तुम्हाला माहीत आहे का टूथपेस्टचा वापराचे अनेक फायदे देखील आहेत. दररोज दात स्वच्छ करण्यासाठी तर आपण टुथपेस्ट वापरतोच. पण त्या व्यतिरिक्त इतरही अनेक गोष्टींसाठी टुथपेस्ट वापरता येते. बऱ्याच गृहिणींकडे काही ना काही किचन जुगाड असतात. आता असाच एक टुथपेस्टचा किचन जुगाड एका गृहिणीने करुन दाखवला आहे.
गृहिणींकडे काही ना काही घरगुती जुगाड असतात. अशाच एका गृहिणीने हा जुगाड दाखवला आहे. तिने आपल्या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात तिने टुथपेस्टचा अनोखा उपयोग दाखवला आहे. कढईत टुथपेस्ट टाकल्याने काय होते, ते तिने या व्हिडीओत दाखवलं आहे. तुम्ही कधी कढईमध्ये टुथपेस्ट टाकलं आहे का? नाही ना.. मग एकदा कढईमध्ये टुथपेस्ट टाकून बघा. हा जुगाड तुमच्या दैनंदिन जीवनातील अनेक समस्यांवर मात करेल. टुथपेस्ट टाकल्यानंतर कढईमध्ये झालेले बदल पाहून तुम्ही थक्क होऊन जाल. एका गृहिणीने या जुगाडाचा शोध लावला असून या अनोख्या जुगाडाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रोजच्या रोज स्वयंपाकात कढई लागतेच. एखाद्या दिवशी भाजी करपली किंवा मग गॅस जास्तच मोठा असला तर कढई लगेच जळतात. तिच्यावर काळे डाग दिसू लागतात. त्यात जर एखाद्या दिवशी काही पदार्थ तळले गेले असतील तर ज्या कढईत तळणं झालं आहे, ती कढई तर जास्तच काळवंडलेली दिसू लागते. म्हणूनच गृहिनीने व्हिडिओमध्ये अॅल्युमिनिअमची कढई एकाच वेळी नव्या सारखी कशी स्वच्छ करता येईल, यावर भन्नाट जुगाड दाखविला आहे. हा प्रयोग तुम्ही देखील करुन पाहू शकता.
(हे ही वाचा : Jugaad Video: बाजारातून केळी घरी आणल्यानंतर त्यात ‘या’ पध्दतीने पेन टाकून पाहा; फायदे पाहून थक्क व्हाल )
तुम्हाला नेमकं काय करायचं?
महिलेने व्हिडिओमध्ये सांगितल्यानुसार, तुम्हाला तुमची काळवंडलेली कढई घ्यायची आहे. यामध्ये तुम्हाला टुथपेस्ट घालायचं आहे. त्यानंतर त्यात थोडसं मीठ घालायचं आहे आणि त्यात थोडसं पाणी घालून त्यानंतर अॅल्युमिनिअम फाॅईल घेऊन मीठ आणि टुथपेस्टचं मिश्रण एकत्र करायचं आहे. त्यानंतर अॅल्युमिनिअम फाॅईलच्या तुकड्याने कढई घासायची आहे. संपूर्ण कढई घासून काढायची आहे. कढईच्या मागचा भागही घासून काढा, त्यामुळे तुमची कढई नव्यासारखी चमकू लागेल, असे व्हिडिओ पोस्ट केलेल्या महिलेचे म्हणणे आहे.
येथे पाहा व्हिडीओ
Ankitanoop या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा जुगाड तुम्हीही नक्की ट्राय करुन पाहा आणि खरंच याचा फायदा तुम्हाला झाला का, हे आम्हाला कमेंट करुन कळवा.
(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या व्हिडीओवर आधारित आहे. लोकसत्ता याची पुष्टी करत नाही.)