Kitchen Jugaad Video: झाडू ही एक अशी वस्तू आहे जी सर्वांच्याच घरात असते. साफसफाई करण्यासाठी नवनव्या वस्तू आल्या तरी आजही झाडू वापरला जातो. घर स्वच्छ ठेवण्यासाठी झाडू हवाच. झाडूशिवाय घरातील साफसफाई पूर्ण होऊच शकत नाही. पण तुम्ही कधी भाताच्या पेजेत झाडू भिजविला आहे का? तुम्हालाही वाटत असेल की, आम्ही तुम्हाला कसा विचित्र प्रश्न विचारतोय, पण एका गृहिणीने असा जुगाड सोशल मिडियावर दाखविला आहे. जे पाहून तुम्हीही चक्कीत व्हाल…
गृहिणींकडे काही ना काही किचन जुगाड असतात. दरम्यान असाच एक जुगाड दाखवणारा अनोखा व्हिडीओ एका महिलेने शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तुम्ही कधी भाताच्या पेजेत झाडू भिजविला आहे का? नाही ना.. मग एकदा भिजवून बघा. हा जुगाड तुमच्या दैनंदिन जीवनातील अनेक समस्यांवर मात करेल. भाताच्या पेजेत झाडू टाकल्यानंतर तुमच्या झाडूमध्ये झालेले बदल पाहून तुम्ही थक्क होऊन जाल. एका गृहिणीने या जुगाडाचा शोध लावला असून या अनोख्या जुगाडाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नेमकं काय करायचं?
घरातील आंगण, बाथरुम स्वच्छ करण्यासाठी ज्या झाडूचा वापर करण्यात येतो, त्या झाडूला माती लागून तो अस्वच्छ होतो. त्याला घाण लागली की, सहज निघत नाही. पण ही घाण काढण्यासाठी महिलेने भन्नाट जुगाड दाखविला आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की, महिलेने अस्वच्छ झालेला झाडू घेतला आहे. झाडू स्वच्छ करण्यासाठी महिलेने भाताची पेज घेतली आहे. महिलेने एका वाटीमध्ये भाताची पेज घेऊन झाडूवर टाकलं आहे. भाताची पेज चिकट असल्याने यामुळे तुमचा झाडू स्वच्छ होईल, झाडूतील संपूर्ण घाण निघून जाईल, असा महिलेने दावा केला आहे.
(हे ही वाचा: Jugaad Video: एक्सपायर औषध गोळ्यांचा स्वयंपाकघरातील ‘या’ कामासाठी वापर करुन पाहा; २ मिनिटांतच चकीत करणारा परिणाम)
येथे पाहा व्हिडीओ
Indian Vlogger Pinki या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा जुगाड तुम्हीही नक्की ट्राय करुन पाहा आणि खरंच याचा फायदा तुम्हाला झाला का, हे आम्हाला कमेंट करुन कळवा.
(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या व्हिडीओवर आधारित आहे. लोकसत्ता याची पुष्टी करत नाही.)