kitchen Jugaad Video: बटाटा इतका लोकप्रिय आहे की, तो प्रत्येकाच्या घरात सहज उपलब्ध आहे. बटाट्याचा खवय्यावर्ग खूप मोठा आहे. कोणत्याही पदार्थात बटाटा घालताच, त्या पदार्थाची चव दुपट्टीने वाढते. बटाट्याची भाजी, भजी, पराठा, खिचडी आपण खाल्लीच असेल. पण बटाट्याचा वापर एका अनोख्या कामासाठी एका गृहिणीने केलं असल्याचे व्हिडिओद्वारे समोर आले आहे. आता तुम्ही म्हणाल पदार्थात वापरण्यात येणारा बटाटा अशा कोणत्या कामासाठी आपल्याला उपयोगी पडू शकतो? एका गृहिणीने एक जुगाड दाखवला आहे. या हटके जुगाडाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
स्वयंपाकघरात कसले ना कसले डाग नेहमीच पडत राहतात. दिसायला हे डाग खूपच घाण दिसते. स्वयंपाकघरात तुम्ही ज्या ठिकाणी सिलिंडर ठेवता तिथे हट्टी डाग जमा होतात. यामुळे फरशी अस्वच्छ दिसू लागते. मात्र, हे डाग स्वच्छ करणे फार अवघड काम असते. कारण फरशी कितीही पुसली तरी हे डाग सहज निघत नाहीत. यात पांढऱ्या फरशीवर हे डाग उठून दिसतात, मात्र, आता महिलांना काळजी करण्याची गरज नाही कारण, गंजाचे डाग स्वच्छ करण्यासाठी एका गृहिणीने बटाट्याचा भन्नाट जुगाड दाखवला आहे. कमी खर्चात गंजाचे डाग कसे स्वच्छ करता येईल, यावर महिलेने काय जुगाड दाखवला आहे, आज आपण पाहूयात…
(हे ही वाचा : Jugaad Video: डास घालवण्यासाठी नारळाचा ‘हा’ भन्नाट जुगाड करुन पाहा; घरात काय घराच्या आसपासही फिरकणार नाहीत!)
तुम्हाला नेमकं काय करायचं?
गृहिनीने व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार, महिलेने एक बटाटा घेतला आहे आणि त्याचे काप करुन महिला सिलिंडरच्या खालच्या भागाला बटाटा घासताना दिसत आहे. सिलिंडरच्या खालच्या भागाला बटाट्याने घासल्याने टाईल्सवर गंजाचे डाग पडणार नाहीत, असा महिलेने दावा केला आहे.
येथे पाहा व्हिडीओ
Aysha’s kitchen hacks या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा जुगाड तुम्हीही नक्की ट्राय करुन पाहा आणि खरंच याचा फायदा तुम्हाला झाला का, हे आम्हाला कमेंट करुन कळवा.
(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या व्हिडीओवर आधारित आहे. लोकसत्ता याची पुष्टी करत नाही.)