Kitchen Jugaad Video : सध्याच्या धावपळीत आयुष्यात अनेक जण घरगुती मसाल्यांऐवजी बाजारातून विकत आणलेले मसाले वापरतात. सहसा मसाले एका बॉक्समध्ये पॅक असतात. एकदा हा बॉक्स उघडला की त्यानंतर मसाल्याच्या बॉक्स पुन्हा कसा पॅक करावा, हेच कळत नाही. अशावेळी आपण एखाद्या डब्यात तसाच बॉक्स ठेवतो पण एक भन्नाट ट्रिक वापरून तुम्ही हा बॉक्स पॅकबंद करू शकता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मसाल्याचा बॉक्स उघडल्यानंतर कसा पॅकबंद करावा, याविषयी एक भन्नाट ट्रिक सांगितली आहे. (Kitchen Jugaad video how to pack masala box or spice box after opening it video goes viral)

हेही वाचा : गोविंदा यांना स्वत:च्याच बंदुकीतून लागली होती गोळी; रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज! बंदुकीच्या गोळीने झालेली जखम बरी होण्यास किती कालावधी लागतो?

मसाल्याचा बॉक्स उघडल्यानंतर कसा पॅकबंद करावा? ( how to pack masala box or spice box after opening it )

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला सांगते, “मसाल्याचे बॉक्स वापरल्यानंतर ते उघडे राहतात आणि त्याचे काय करावे, याचे काहीही कळत नाही. नुकतीच मी इन्स्टाग्रामवर याची रील बघितली आणि ही हॅक ट्राय करून बघितल्यानंतर मला खूप आवडली. मी आज तुमच्याबरोबर ही हॅक शेअर करणार आहे. व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे, मसाल्याच्या बॉक्सची दोन्ही बाजू कापून घ्या त्यानंतर त्या दोन्ही बाजू आतमध्ये फोल्ड करून पॅक करायच्या आहेत. अनेकदा मसाल्याचे बॉक्स पॅक करताना मध्ये खूप गॅप दिसून येते.अशावेळी आतला मसाला तो एका रबर किंवा क्लिपनी पॅक करून घ्या आणि त्यानंतर हा बॉक्स पॅक करा. खूप अप्रतिम अशी हॅक आहे आणि मसाले सुद्धा आपले फ्रेश राहतात.”

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

हेही वाचा : “नवरात्रीमध्ये खा केळ्यांचे वेफर्स, खारीक अन् काजू-बदामाची पुरी”, सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकरचा सल्ला, तज्ज्ञांचे काय आहे मत?

world_of_chetana या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, ” एकदा नक्की ट्राय करून बघा” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खरंच छान माहिती दिली.” तर एका युजरने लिहिलेय, “ही हॅक आयुष्यभर कामात येईन.” आणखी एका युजरने लिहिलेय, “हे खरंच खूप भारी आहे.”

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kitchen jugaad video how to pack masala box or spice box after opening it video goes viral ndj