Utensils Cleaning Tips: भांडी घासणे हे आपल्यापैकी बहुतेकांना दररोज तोंड द्यावे लागणारे काम आहे. अनेकदा स्वयंपाकघरात काम करताना भांडी जळतात. यानंतर जळलेल्या भांड्यातून हट्टी आणि घाणेरडे डाग काढून टाकणे खूप कठीण काम होते. स्वयंपाकासाठी वापरण्यात आलेल्या भांड्यांवर स्निग्ध आणि तेलकट डाग हे भांडी घासणे कठीण बनवते, जे स्वच्छ करण्यासाठी खूप वेळ लागतो. पण आता काळजी करु नका, एका महिलेने एका जुगाडाच्या मदतीने ही भांडी अगदी कमी वेळात अगदी सहज साफ कशी करता येईल, यावर उपाय शोधून काढला आहे. त्याच्याबद्दल जाणून घेऊया.
गृहिणींकडे काही ना काही किचन जुगाड असतात. दरम्यान अशाच एक स्वयंपाकघरातील जुगाड दाखवणारा अनोखा व्हिडीओ एका महिलेने शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा जुगाड तुमच्या दैनंदिन जीवनातील अनेक समस्यांवर मात करेल. एका गृहिणीने या जुगाडाचा शोध लावला असून या अनोख्या जुगाडाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आपण कितीही चांगला साबण किंवा लिक्विड सोप वापरुही अनेकदा हे भांड्यावरील जळलेले डाग निघत नाहीत. अशावेळी काळे डाग पडलेली भांडी दुसऱ्या पदार्थासाठी वापरणेही शक्य नसते. बरेचदा भांडी इतकी खराब होतात किंवा त्यांचे कोपरे इतके खराब होतात की, कितीही घासले तरी ते स्वच्छ होत नाही. मग ते घासण्यासाठी नेमकं काय करावं आणि त्यासाठी नेमकी कोणती ट्रिक वापरावी, महिलेने सांगितेला जुगाड करुन पाहा.
(हे ही वाचा : Jugaad Video: घरगुती गॅस सिलिंडर लवकर संपतोय? ‘हा’ सोपा जुगाड करुन पाहा; पैशांची होईल मोठी बचत, व्हिडिओ पाहाच )
नेमकं काय करायचं?
व्हिडीओत तुम्ही पाहाल तर गृहिणीने सांगितल्यानुसार, आपण दररोज साबण किंवा डिशवाॅशच्या मदतीने काळपट भांडी स्वच्छ करुन घेतो. आपली भांडी स्वच्छ तर होतात, परंतु तुमच्या भांड्याच्या डिझाईनमध्ये म्हणजेच त्यांचे कोपरे सुध्दा इतके खराब असतात की तुम्ही कितीही साबणाने घासले तरीही ते स्वच्छ होत नाही यासाठी महिलेने ज्या ठिकाणी तुमचा भांडी घासण्याची स्क्रब पोहोचत नाही, त्या जागी तुम्ही काटा चमच वापरु शकता. म्हणजेच काटा चमच्यातील काटाच्या मदतीने तुम्ही भांड्याचे कोपरे नीट स्वच्छ करु शकता. यामुळे तुमची भांडी चकाचक होतील, असे महिलेने सांगितले आहे.
येथे पाहा व्हिडिओ
P D vlogs या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा जुगाड तुम्हीही नक्की ट्राय करुन पाहा आणि खरंच याचा फायदा तुम्हाला झाला का, हे आम्हाला कमेंट करुन कळवा.
(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या व्हिडीओवर आधारित आहे. लोकसत्ता याची पुष्टी करत नाही.)