स्वयंपाक करण्यासारखं अवघड आणि मोठे काम नाही. अनेक जण स्वयंपाक करण्याच्या काम फार क्षुल्लक वाटते पण प्रत्यक्षात सत्य वेगळे आहे. स्वयंपाक करणे म्हणजे फक्त चार पोळ्या अन् भाजी करणे नव्हे. जेवण दोन माणसांचे असो की दहा माणसांचे त्यासाठी तितकाच व्याप असतो. स्वयंपाक करताना अनेक छोटी -मोठी काम करावी लागतात. स्वयंपाक करण्यासाठी भाजी काय करायची इथपासून सुरवात होते ते जेवण झाल्यावर सर्व भांडी घासून ओटा साफ केल्यानंतर संपते. यापैकी कोणतेच काम सोपे नसते.
स्वयंपाक करताना अनेकदा वेगवेगळ्या अडचणी समोर येतात किंवा अनेकदा चुका होतात. कधी दूध ऊतू जाते, तर कधी भात करपतो. स्वयंपाक करणाऱ्यालाचा दूध उतू गेले तरी ओटाही साफ करावा लागतो आणि भाजी-भात काहीही करपले तर भांडेही साफ करावे लागते. या प्रत्येक छोट्या कामासाठी प्रचंड मेहनत लागते. रोजची भांडी घासायची म्हटले तरी अनेकांची कंबर दुखू लागते त्यात अशी करपलेली भांडी स्वच्छ करणे म्हणजे कामात काम वाढते आणि मेहनतही दुप्पट करावी लागते. पण आता काहीही करपले तरी चिंता करू नका कारण येथे एक भन्नाट जुगाड सांगितला आहे जो वापरून तुम्ही करपलेले भांडी झटक्यात साफ करू शकता. त्यासाठी तुम्हाला तासभर घासणीने भांडी घासण्याची आवश्यकता नाही.
करपलेली भांडी घासणे म्हणजे डोक्याला ताप!
भांडी घासणे हे स्वयंपाकमधील एक काम आहे. अनेकदा स्वयंपाक करताना जरा दुर्लक्ष झाले की, भाताचा कुकर करपतो किंवा कढईतील भाजी करपते. अशा वेळी भांड्याच्या तळाशी जळलेल्या भाताचा किंवा भाजीचा घट्ट थर जमा होतो तो सहजा सहजी निघत नाही. अनेकदा भांडे भिजवून ठेवून मग घासतात पण तरीही ते नीट साफ होत नाही. भांडे पूर्वीसारखे चकचकीत करण्यासाठी सर्व ताकद पणाला लावून तासभर भांडे घासले तरीही ते स्वच्छ होत नाही. पण आता असे होणार नाही. कारण एक सोपा जुगाड तुमचे हे काम सोपे करणार आहे. विशेष म्हणजे त्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करायची नाही फक्त स्वयंपाक घरात असलेले दोन पदार्थ वापरा अन् झटक्यात करपलेले भांडे स्वच्छ करा.
करपलेले भांडे स्वच्छ करण्याची सोपी ट्रिक
करपलेल्या भांड्यामध्ये प्रथम भरपूर मीठ टाका. त्यानंतर संपूर्ण भांड्यामध्ये सर्व बाजूने व्हिनेगर होता. आता त्यात एक ग्लास पाणी ओता आणि ते पाणी उकळण्यासाठी गॅसवर ठेवात. उकळी येईपर्यंत पाणी गरम करा. त्यानंतर गॅसवरून भांडे खाली घेऊन चमच्याने करपलेले चिकट थर मोकळा करा आणि ते पाणी ओतून द्या. आता घासणीने एकदा भांडे चांगले घासून साफ करा. तुमचे भांडे पूर्वीसारखे चकचकीत आणि साफ होईल.
हा जुगाड ट्रीक mealswithabi नावाच्या पेजवर पोस्ट केला आहे. हा जुगाड उपयोगी आहे की नाही ते स्वत: वापरून पाहा.