Kitchen Jugaad Video: पालक पनीर, मटार पनीर, पनीर पुलाव, पनीर टिक्का… एक ना दोन पनीरपासून असे कितीतरी पदार्थ पनीरपासून बनवतात येतात. पनीरचा वापर काही वेळा थेट किंवा काही वेळा थोडे फ्राय करून केला जातो. पण तुम्ही कधी पनीरमध्ये टुथपेस्ट टाकून वापरून पाहिला आहे का? एका गृहिणीने हा जुगाड दाखवला हे. या हटके जुगाडाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

नक्की काय करायचं ?

paneer makana tikki recipe
पनीरची नवी रेसिपी ट्राय करायचीय? अवघ्या काही मिनिटांत करा ‘पनीर मखाना टिक्की’
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Viral video of a daughter dancing in the hospital where her mother is admitted craze for reel
अशी मुलगी नसलेलीच बरी! आई रुग्णालयात दाखल असताना पोटच्या पोरीने केलं असं काही की…, VIDEO पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप
kitchen Jugad Tired of removing coconut
नारळाच्या शेंड्या काढून वैतागलात? ‘हा’ सोपा जुगाड एकदा वापरा अन् झटक्यात होईल काम
Boy Spoils Sister's Rangoli Caught on CCTV
संधी साधली अन् बहिणीने काढलेली रांगोळी खराब केली, पण अशी झाली पोलखोल, VIDEO एकदा पाहाच
Milk paneer or curd Which is healthiest dairy product
दूध, पनीर व दही यांपैकी कोणता पदार्थ आहे सर्वांत जास्त फायदेशीर? कसे करावे सेवन, घ्या तज्ज्ञांकडून जाणून….
viral video of woman stole a bench outside the building shocking video goes viral on social media
VIDEO: अशा महिलांचं करायचं तरी काय? भरदिवसा महिलेनं काय चोरलं पाहून हसावं की रडावं? हेच समजणार नाही
Mumbai Street Style Masala Pav Easy recipe
मुंबई स्ट्रीट स्टाइल मसाला पाव, घरच्या घरी झटपट बनवा सोपी रेसिपी

आता तुम्ही म्हणाल पनीरमध्ये टथपेस्ट कोण टाकतं? चला जाणून घेऊयात तुम्हाला नक्की काय करायचंय…तुम्हाला करायचं काय आहे, तर कोणताही पदार्थ बनवण्यासाठी तुम्ही पनीर आणला की त्याचा छोटासा तुकडा कापून बाजूला ठेवा. हा तुकडा किसणीवर किसून घ्या. आता यात एक चमचा गव्हाचं पीठ टाका. थोडासा लिंबूरस टाका. आता यात टुथपेस्ट टाका. चिमूटभर हळद टाकून हे मिश्रण हातानी मिक्स करा.

पनीर वापरताना त्यात टुथपेस्ट टाका

आपल्या त्वचेची काळजी घेणं ही एक चांगली सवय आहे. मात्र बहुतांश महिला दिवसभरातील कामांमुळे स्वत:कडे दुर्लक्ष करतात. त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण फार काही करत नाही.त्वचेची चमक टिकवून ठेवण्यासाठी आणि त्वचेचे लाड करण्यासाठी, सलूनमध्ये जाणे यासाठी सहसा गृहिणी वेळ देत नाहीत. मात्र काळजी करु नका आम्ही तुमच्या त्वचेसाठी घरघुती उपाय घेऊन आलो आहोत. गृहिणी दिवसभर घरच्या कामात व्यस्त असतात. त्यांना स्वतःकडे लक्ष द्यायलाही वेळ नसतो. काम करून हात आणि पायांच्याही समस्या उद्भवतात. हातपाय काळे, कोरडे पडतात. अशावेळी हे मिश्रण तुम्हाला कामी येईल. हे मिश्रण तोंडाला लावू नका. तोंडाला लावायचं असेल तर यात टुथपेस्ट टाकू नका, असंसुद्धा या महिलेने व्हिडीओत सांगितलं आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> पावसाळ्यात फिरायला जाताय? मलेरिया होऊ नये म्हणून ‘अशी’ घ्या काळजी अन् ॲडमिट होण्याचा धोका टाळा

 गृहिणींकडे काही ना काही किचन जुगाड असतात, ज्यामुळे आपली बरीच डोंगराएवढी मोठी वाटणारी कामं कधी कधी किचनमधल्याच वस्तूंनी चुटकीशीर होऊन जातात. दरम्यान एका गृहिणीने खास महिलांसांठी आज असाच एक हटके आणि टेन्शन दूर करणारा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे. @Didi_ye_kaise_kru यूट्यूब अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा.

(सूचना – या लेखातील माहिती सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. लोकसत्ता संकेतस्थळ याची हमी देत नाही.)