Kitchen jugad video: गृहिणींकडे काही ना काही किचन जुगाड असतात, ज्यामुळे आपली बरीच डोंगराएवढी मोठी वाटणारी कामं कधी कधी किचनमधल्याच वस्तूंनी चुटकीशीर होऊन जातात. एका गृहिणीने आज असाच एक हटके आणि टेन्शन दूर करणारा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे. गृहिणींनो तुम्ही कधी रिमोटला चपातीचं पीठ लावलंय का? आता तुम्ही म्हणाल रिमोटला चपातीचं पीठ कशाला ? मात्र थांबा याचा मोठा फायदा आहे. तुम्हाला हा उपाय जितका विचित्र वाटतो आहे त्यापेक्षा कितीतरी जास्त तो फायद्याचा आहे. मात्र, नेमकी कमाल काय होते हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. चला तर पाहूयात यामुळे नेमकं काय होतं.

आता एसीच्या रिमोटवर चपातीचं पीठ फिरवल्याने काय होईल, त्याचा काय फायदा, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, महिला चपातीचं मळलेल्या पिठाचा एक छोटासा गोळा घेते आणि तो रिमोटवर फिरवते. संपूर्ण रिमोटवरून तो ती हा गोळा फिरवून घेते.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, महिलेने व्हिडीओत दिलेल्या माहितीनुसार यामुळे रिमोट स्वच्छ होतो. हा रिमोट इथं, तिथं पडलेला असतो. कित्येकांचे हात त्याला लागलेले असतात. तुम्हीही तुमचा रिमोट पाहिला असेल तर त्यावर तुम्हाला डाग दिसतील. रिमोटला कव्हर जरी घातलेलं असेल तर त्यात थोडीतरी धूळ तुम्हाला दिसेल. रिमोट कितीही पुसून स्वच्छ केला तरी त्याच्या कोपऱ्यात, बटणांमध्ये साचलेली घाण मात्र जात नाही. पण या उपायामुळे तुमच्या रिमोटचा प्रत्येक कोपरा स्वच्छ होईल. पीठ चिकट असल्याने रिमोटवरील सर्व धूळ त्याला चिकटून येईल. आपल्या घरात हा रिमोट इथं, तिथं पडलेला असतो. कित्येकांचे हात त्याला लागलेले असतात. तुम्हीही तुमचा रिमोट पाहिला असेल तर त्यावर तुम्हाला डाग दिसतील. रिमोटला कव्हर जरी घातलेलं असेल तर त्यात थोडीतरी धूळ तुम्हाला दिसेल. रिमोट कितीही पुसून स्वच्छ केला तरी त्याच्या कोपऱ्यात, बटणांमध्ये साचलेली घाण मात्र जात नाही. पण या उपायामुळे तुमच्या रिमोटचा प्रत्येक कोपरा स्वच्छ होईल.

पाहा व्हिडीओ

Shreya’s creative corner यूट्यूब अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा.