Kitchen jugad video: गृहिणींकडे काही ना काही किचन जुगाड असतात, ज्यामुळे आपली बरीच डोंगराएवढी मोठी वाटणारी कामं कधी कधी किचनमधल्याच वस्तूंनी चुटकीशीर होऊन जातात. एका गृहिणीने खास महिलांसांठी आज असाच एक हटके आणि टेन्शन दूर करणारा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे. गृहिणींनो तुम्ही कधी पेपरवर कांदा ठेवला आहे का? आता तुम्ही म्हणाल कांदा आणि पेपरवर कशाला ? मात्र थांबा पावसाळ्यात याचा मोठा फायदा आहे. तुम्हाला हा उपाय जितका विचित्र वाटतो आहे त्यापेक्षा कितीतरी जास्त तो फायद्याचा आहे.

महिलेने सांगितला भन्नाट किचन जुगाड

how to reuse old non stick pan and tawa
कोटिंग खराब होताच नॉन स्टीक पॅन फेकून देताय? मग जरा थांबा, त्याचा ‘असा’ करा पुन्हा वापर
Punekar man wrote funny message in back of the car Photo goes viral on social media puneri pati
याला म्हणतात पुणेकरांचा धाक; पठ्ठ्यानं गाडीच्या मागे लिहिलं असं काही की PHOTO पाहून पोट धरुन हसाल
Puneri pati viral Puneri Old Man Punctures Car Tyre For Parking In His Spot Funny Video
पुणेकरांचा नाद नाय! गेट समोर गाडी पार्क करणाऱ्यांना घडवली जन्माची अद्दल, आजोबांचा VIDEO पाहून पोट धरुन हसाल
Kitchen Jugaad Video
Jugaad Video: अगरबत्तीचा बॉक्स रिकामा होताच फक्त ‘हे’ एक काम करा; पावसाळ्यातील ‘ही’ मोठी समस्या होईल कायमची दूर
woman inside Indian railways over seat issues shocking video goes viral
हद्दच झाली! ट्रेनमध्ये एका सीटसाठी महिलेने ओलांडली मर्यादा; VIDEO पाहून संतापले लोक
pune video viral
पुण्यातील रिक्षावाल्याने केला अनोखा जुगाड, पावसाळ्यात रस्ता नीट दिसावा म्हणून…; VIDEO एकदा पाहाच
how to remove corn seeds easily
Kitchen Jugaad : फक्त एका मिनिटांत काढा मक्याचे दाणे, जाणून घ्या ही हटके ट्रिक
video having fun with the kids under the waterfall suddenly the water level rose and the picture changed shocking video goes viral
लोणावळ्याची घटना ताजी असतानाच आणखी एक VIDEO समोर; काही सेंकदांत घेतलेल्या निर्णयामुळे असा बचावला चिमुकला

पावसाळ्याचे आगमन होताच वातावरणात थंडावा निर्माण होतो. उन्हापासून काहीसा दिलासा मिळतो. या दिवसात कांद्याची भजी खाण्याचा मोह कोणाला आवरत नाही. काहीजण वर्षभर पुरेल इतका कांदा एकदाच खरेदी करून साठवून ठेवतात. अशावेळी या साठवून ठेवलेल्या कांद्याची योग्य ती काळजी घेतली नाही तर, तो पावसाच्या ओलाव्याने खराब होतो.कांदा व्यवस्थित साठवून ठेवल्यास महिनाभर आरामात टिकतो. अन्यथा कांद्याला बुरशी लागते, ओलाव्यामुळे इतर कांदेही खराब होतात. यासाठीच या गृहिणीने हा हटके जुगाड सांगितला आहे.

पेपरध्ये कांदे ठेवताच कमाल होईल

पावसाळ्यामुळे आपण एकत्र कांदे घेऊन ठेवतो मात्र कांदे साठवून ठेवल्यास त्याला पाणी सुटतं आणि ते खराब होतात. मात्र पेपर वापरल्यास हे कांदे अगदी ६ महिने खराब होणार नाही. या पेपरमुळे कांद्याचं संपूर्ण पाणी शोषून घेतलं जातं आणि कांदे सुके राहतात. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, या महिलेने सगळे कांदे का पेपरवर पसरवले आहेत आणि नंतर पॅक केले आहेत. तुम्हीही पावसाळ्यात एकत्र घेतलेले कांदे अशाप्रकारे साठवून ठेऊ शकता. पावसाळ्यातील आर्द्र वातावरणामुळे कांद्याला कोंब फुटतात. यासाठी कांदा खरेदी केल्यानंतर कागदावर पसरवा. कागद जास्तीची आर्द्रता शोषून घेईल, ज्यामुळे कांद्याला कोंब फुटणार नाही, आणि दीर्घकाळ चांगले टिकतील.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Beauty Tricks : केस काळेभोर होण्यासाठी मेहंदी कशी भिजवावी? जाणून घ्या ही पद्धत, पाहा व्हिडीओ

@Puneritadka यूट्यूब अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

(सूचना – या लेखातील माहिती सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे.)