Kitchen Jugaad: स्वयंपाक करताना सर्वात कंटाळवाणं आणि वेळ लागणारं काम कोणतं विचारलं तर कुणीही सांगेल ते म्हणजे लसूण सोलण्याचं. लसूण हा स्वयंपाकात अनेक पदार्थांची चव वाढवण्यासाठी वापरला जातो. एखाद्या पदार्थाला लसणाची खमंग फोडणी दिली तर तो अधिकच स्वादिष्ट लागतो. लसूण खाण्याचे आपल्या शरीराला अनेक फायदे आहेत. मात्र लसणीच्या कांद्यापासून एकएक पाकळी वेगळी करून त्याची साल काढणं म्हणजे खूपच त्रासदायक. लसूण सोलण्यात वेळही जातो आणि कंटाळाही येतो. पण तुमचं हे काही तासांचं काम अवघ्या काही मिनिटांत होईल. वॉशिंग मशीनमध्ये अवघ्या काही सेकंदामध्ये ढिगभर लसूण सोलून होईल. या जबरदस्त किचन जुगाडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
महाराष्ट्रीयन स्वयंपाकात लसणाचा हमखास वापर केला जातो. पालेभाज्या, लोणचं, चटणीसारख्या पदार्थांमध्ये भरपूर लसणाच्या पाकळ्या वापरल्या तरच ते पदार्थ चविष्ट होतात. मात्र स्वयंपाकासाठी एवढा लसूण वारंवार सोलणं हे एक डोकेदुखीचं काम असतं. एकतर लसणाला उग्र वास येतो शिवाय लसूण सोलताना आपली बोटंही दुखू लागतात. बाजारात सोललेला लसूण विकत मिळतो. मात्र तो फारच महाग असतो. त्यामुळे आता टेंशन घेऊ नका कारण तुमची कपडे धुणारी मशीन तुमची लसूणही सोलून देईल. या जबरदस्त किचन जुगाडा चा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
गृहिणींकडे काही ना काही किचन जुगाड असतात, ज्यामुळे आपली बरीच डोंगराएवढी मोठी वाटणारी कामं कधी कधी किचनमधल्याच वस्तूंनी चुटकीशीर होऊन जातात. एका गृहिणीने खास महिलांसांठी आज असाच एक हटके आणि टेन्शन दूर करणारा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे.
आता तुम्ही म्हणाल वॉशिंग मशीनमध्ये लसूण सोलायचा तरी कसा? चला तर मग पाहूयात. सर्वाधी तुम्हाला जेवढा हवाय तेवढा लसूण घ्या. यानंतर लसणाच्या पाकळ्या १० ते १५ मिनिटं थंड पाण्यात टाकून ठेवा.आता कॉटन बॅग किंवा सुती कापड घ्या. त्यात भिजवलेला लसूण ठेवून त्यात गुंडाळून घ्या. आता लसूण गुंडाळलेलं हे कापड वॉशिंग मशीनच्या ड्रायरमध्ये टाका. झाकण लावून ५ सेकंद फिरवून घ्या. आता वॉशिंग मशीनमधील लसूण ठेवलेलं कापड बाहेर काढा आणि उघडून पाहा. लसणीच्या साली निघालेल्या दिसतील. पण तरी त्यातील एक एक लसूण निवडून काढणंही शक्य नाही. त्यामुळे पुन्हा ही लसूण सालीसह पाण्यात टाका. साली हलक्या असल्याने त्या पाण्याच्या वर तरंगतील तर लसूण पाण्याच्या तळाशी राहिल.
पाहा व्हिडीओ
गृहिणींकडे बरेच घरगुती भन्नाट जुगाड असतात. काही गृहिणी सोशल मीडियावर हे जुगाड शेअर करतात. अशाच एका गृहिणीने शेअर केलेला हा जुगाड सध्या खूप व्हायरल होतोय.