Kitchen jugad video: गृहिणींकडे काही ना काही किचन जुगाड असतात, ज्यामुळे आपली बरीच डोंगराएवढी मोठी वाटणारी कामं कधी कधी किचनमधल्याच वस्तूंनी चुटकीशीर होऊन जातात. एका गृहिणीने खास महिलांसांठी आज असाच एक हटके आणि टेन्शन दूर करणारा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे. गृहिणींनो तुम्ही कधी कांद्यात खिळा घुसवून पाहिला आहे का? आता तुम्ही म्हणाल कांदा आणि खिळा कशाला ? मात्र थांबा याचा मोठा फायदा आहे. तुम्हाला हा उपाय जितका विचित्र वाटतो आहे त्यापेक्षा कितीतरी जास्त तो फायद्याचा आहे. मात्र, नेमकी कमाल काय होते हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. चला तर पाहूयात यामुळे नेमकं काय होतं. आतापर्यंत कांदा हा आपण जेवणातच वापरला आहे. मात्र, हाच कांदा आपलं आणि आपल्या कुटुंबाचं रक्षण करू शकतो. यासाठी एका गृहिणीने किचन जुगाड दाखवला आहे. या हटके जुगाडाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
गृहिणींकडे बरेच घरगुती भन्नाट जुगाड असतात. काही गृहिणी सोशल मीडियावर हे जुगाड शेअर करतात. अशाच एका गृहिणीने शेअर केलेला हा जुगाड सध्या खूप व्हायरल होतोय.
पाली पळवण्यासाठी उपाय
घर कितीही स्वच्छ ठेवलं तरी, पालींचा उपद्रव काही केल्या कमी होत नाही. घराच्या भिंतीवर पाली सर्रास फिरतात. ज्यामुळे घरात रोगराई देखील पसरते. काही घरांमध्ये लहान मुलं देखील असतात. पाली घरात फिरल्यावर विष पसरते. ज्यामुळे आपण आजारी पडण्याची देखील शक्यता निर्माण होते. बऱ्याचदा पाली पाहून किळसवाणे वाटते.खासकरून स्वयंपाकघरात पालींचा जास्त वावर दिसून येतो. एकदा का घरात पाल शिरली, तर तिला बाहेर घालवणे फार कठीण काम वाटते. पाल कधी कुठे कोणत्या गोष्टीवर फिरेल हे सांगता येत नाही. मात्र आता काळजी करु नका. एक कांदा तुमचं हे टेन्शन कायमचं दूर करणार आहे.
नेमकं करायचं काय ?
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, महिलेनं कांद्यामध्ये खिळा ठोकला आहे. त्याच्या दोन बाजूंमध्ये समोरासमोर असा खिळा घुसवायचा आहे. हा खिळा तुम्हाला कांद्यात तसाच ठेवायचा नाही तर कांद्यातून आरपार झाल्यानंतर तो कांद्यातून बाहेर काढायचा आहे. यामुळे कांद्याला होल पडतील.सुईदोरा घ्या. कांद्याला पाडलेल्या छिद्रांतून सुईने दोरा टाकून तो दोरा बांधून घ्या. कांदा लटकवता येईल इतका दोरा असावा. हा कांदा भिंतीला एक खिळा ठोकून तिथं लटकवा. रात्री झोपण्याआधी तुम्ही हे किचनवर ठेऊन सकाळी ते काढून टाकू शकता. अशानं पाली घरातून कायमच्या पळून जातील. त्यामुळे इथून पुढे तुम्हाला केमीकल उत्पादनं घेऊन पैसे वाया घालवायची गरज नाही.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> Kitchen Jugaad : किचनच्या तेलकट, चिकट झालेल्या टाइल्स काही मिनिटांत करा चकाचक; वापरा फक्त 3 ‘या’ सोप्या ट्रिक्स
@palpalrealvlog2879 यूट्यूब अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा.