Kitchen jugad video: गृहिणींकडे काही ना काही किचन जुगाड असतात, ज्यामुळे आपली बरीच डोंगराएवढी मोठी वाटणारी कामं कधी कधी किचनमधल्याच वस्तूंनी चुटकीशीर होऊन जातात. दरम्यान एका गृहिणीने खास महिलांसांठी आज असाच एक हटके आणि टेन्शन दूर करणारा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. तुम्हालाही मिरची चिरायची म्हंटलं की नको वाटतं का? मग महिलेनं सांगितलेला हा भन्नाट जुगाड एकदा नक्की करुन पाहा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुमच्यापैकी अनेकांना मसालेदार, झणझणीत तिखट जेवण आवडत असेल, यासाठी जेवणात हिरव्या मिरचीचा वापर केला जातो. पण हिरवी मिरची कापल्यानंतर अनेकदा हातांची जळजळ जळजळ होते. साबणाने हात धुतले तरी अनेक तास ही जळजळ कमी होण्याचे नाव घेत नाही अशावेळी काय करावे हेही सुचत नाही, यात चुकून तोच हात डोळ्यांना किंवा शरीराच्या इतर भागांवर लागला तर तिथेही आग होते. पण हिरवी मिरची चिरल्यानंतर हातांची जळजळ होऊ नये यासाठी खालील टिप्स नक्कीच फॉलो करु शकता.

स्वयंपाकघरातील सर्वात कठीण काम म्हणजे हिरव्या मिरच्या तोडणे. हिरवी मिरची कापताना लोकांना अनेकदा हाताच्या जळजळीचा सामना करावा लागतो. पण भारत हा जुगाडु लोकांचा देश आहे, इथे प्रत्येक गोष्टीचं उत्तर आहे. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ज्यामध्ये हिरवी मिरची कापण्याचा जुगाड सांगण्यात आला आहे.एका महिलेने हिरवी मिरची कापताना हातात जळजळ होऊ नये यासाठी उपाय शोधला आहे. महिलेने तिच्या अंगठ्यावर एक छोटासा लाकडी चमचा बांधला आणि मग त्याच्या मदतीने हिरव्या मिरच्या तोडायला सुरुवात केली. अशा प्रकारे, मिरचीचा तिखट रस तिच्या हाताच्या त्वचेपर्यंत पोहोचू शकला नाही. साधारणपणे हिरवी मिरची कापताना तीव्रतेमुळे हातात जळजळ होते, परंतु या सोप्या आणि उपायाने ही समस्या दूर केली आहे.

तसेच जेव्हा तुम्ही बाजारातून मिरच्या आणता तेव्हा हा जुगाड वापरून मिरच्यांचे देठ काढून ठेवा अशानं मिरच्या खूप दिवस राहतात खराब होत नाहीत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “हे फक्त भारतातच घडू शकतं” मगरीचा जबडा बांधला अन् थेट खांद्यावर घेतलं; तरुणाच्या धाडसाचा VIDEO पाहून थक्क व्हाल

ही पद्धत उपयुक्त तर आहेच, पण ती वापरून पाहण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागत नाहीत. जे लोक स्वयंपाकघरात हिरवी मिरची कापण्यास टाळाटाळ करतात त्यांच्यासाठी हा उपाय उत्तम उपाय ठरू शकतो. असे घरगुती उपाय दाखवतात की स्वयंपाकघरात काम करणे ही केवळ एक कला नाही तर एक शास्त्र देखील आहे जिथे मोठ्या समस्या थोड्या कल्पकतेने आणि सहजतेने सोडवता येतात. हिरवी मिरची कापताना तुम्हालाही जळजळ होत असेल तर ही पद्धत अवश्य वापरून पहा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kitchen jugad video woman is cutting green chillies by holding a wooden spoon in her thumb srk