Kitchen Sink Cleaning Tips: घरातील सगळ्यात अस्वच्छ ठिकणांमध्ये किचन सिंक असते. किचन सिंक जर खूप खराब असेल तर ते स्वच्छ करण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. त्यावरील डाग इतके हट्टी असतात की ते काढण्यासाठी साबण पुरेसे ठरत नाही. याशिवाय सिंकमध्ये नेहमी पाणी साचत राहिल्यास त्यावर गंजाचे डागही तयार होतात. अशा प्रकारच्या घाणीमुळे सिंकची चमक तर खराब होतेच पण स्वयंपाकघरातील स्वच्छताही बिघडते. तुमच्या घरातील किचन सिंक खराब झाले आहे आणि ते कसे स्वच्छ करावे, हा प्रश्न पडला आहे का? तर आता काही काळजी करू नका. कारण तुमचं किचन सिंक नव्या सारखं कसं स्वच्छ करता येईल, यावर एका महिलेने जुगाड दाखविला आहे.
गृहिणींकडे काही ना काही किचन जुगाड असतात, आता सोशल मिडीयावर एका गृहिणीने किचन जुगाडाचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा लिंबू आणि किचन सिंकचा जुगाड आहे. स्वयंपाकघरातील सगळ्यात अस्वच्छ ठिकाणांमध्ये किचन सिंक असते. सिंक ही अशी जागा आहे जिथे ओलाव्यामुळे जंतूंना वाढण्याची पुरेशी संधी मिळते. अनेकदा काही लोकांच्या स्वयंपाकघरातील सिंक चिकट आणि घाण दिसते. जर तुम्ही दररोज सिंक साफ केला नाही तर तुम्ही आजारी पडू शकता. किचन सिंकवर लागलेले डाग काढून टाकण्यासाठी गृहिनी अनेक उपाय करत असतात. तरीही त्यांना फायदा होत नाही.
(हे ही वाचा : Jugaad Video: चपातीचे मळलेले पीठ एकदा AC च्या रिमोटला लावून बघा; काय कमाल झाली एकदा पाहाच!)
किचन सिंक जर खूप खराब असेल तर ते स्वच्छ करण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. पण आता काळजी करण्याची गरज नाही. गृहिणींकडे काही ना काही किचन जुगाड असतात. दरम्यान अशाच एक स्वयंपाकघरातील जुगाड दाखवणारा अनोखा व्हिडीओ एका महिलेने शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तुम्ही कधी किचन सिंकमध्ये लिंबू टाकून सिंक स्वच्छ केलं आहे का? नाही ना.. मग एकदा सिंकमध्ये असा जुगाड करुन पाहा…
व्हिडीओत दाखविल्यानुसार, गृहिणीने सर्वात आधी शम्पू घेतलं आहे. शॅम्पूचे तीन ते चार थेंब बेसिंगमध्ये टाकलं आहे. त्यानंतर एक रसाळ लिंबू घेऊन त्याला अर्ध कापून घेतलं आहे. आता जिथे शॅम्पू टाकलं आहे त्या ठिकाणी कापलेलं लिंबू चोळत चोळत संपूर्ण सिंकमध्ये पसरविलं आहे. सिंकला शॅम्पू-लिंबू दहा मिनिटं लावून ठेवा आणि नंतर जाड स्क्रबरनं घासून घ्या. घासल्यानंतर तुमचं सिंक पाण्याने धुवून घ्या. असा उपाय केल्याने तुमचा किंचन सिंक नव्यासारखा चमकेल, असा दावा महिलेने केला आहे.
Prajakta Salve या युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा जुगाड करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
Disclaimer:या लेखात देण्यात आलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या व्हिडीओवर आधारित आहे. लोकसत्ता याची पुष्टी करत नाही.)