Smart Hacks : घरात कितीही साफसफाई केली तरी पालींचा उपद्रव काही कमी होत नाही. घराच्या भिंतींवर पाली फिरत असतात; ज्या दिसायला खूप वाईट दिसतात. त्याशिवाय त्यांना पाहून घरातील लहान मुलेही खूप घाबरतात किंवा आपल्यालाही पाहताना किळसवाणे वाटते. खासकरून स्वयंपाकघरात पालींचा जास्त वावर दिसून येतो. एकदा का घरात पाल शिरली, तर तिला बाहेर घालवणे फार कठीण काम वाटते. कित्येकदा अनेक प्रयत्न करूनही ती जात नाही. अशा वेळी ती जेवणात पडण्याची किंवा पदार्थ विषबाधित होण्याची फार शक्यता असते. या सर्व पार्श्वभूमीवर आज आपण असे काही घरगुती उपाय जाणून घेऊ की, ज्यांच्या मदतीने पाली न मारताही घरातून कायमच्या पळून जातील.

घरामधून पालींना पळवून लावण्याचे सोपे घरगुती उपाय

घरातील पाली कशा पळवून लावायच्या हे जाणून घेण्यापूर्वी त्या घरात कशा प्रवेश करतात हे समजून घेऊ. पाली सहसा किटकांसारख्या अन्नाच्या शोधत घरात शिरतात. त्यामुळे घरात नेहमी स्वच्छता राखणे गरजेचे आहे. घराचे तापमानही पालींना आकर्षित करते. घरात भरपूर सूर्यप्रकाश असला तरी पाली घरात शिरतात आणि त्यांना ओलसरपणाही आवडतो. त्यामुळे त्या दमट भागातही खूप दिसतात. अशा परिस्थितीत घरातून पालींना पळवून लावण्यासाठी काही सोपे उपाय आपण जाणून घेऊ.

Majhi Ladki Bahin Yojana
‘लाडकी बहीण’ योजनेचे ३ हजार रुपये अजूनही तुमच्या खात्यात जमा झाले नाहीत? कुठे तक्रार करणार? जाणून घ्या…
Amitabh Bachchan And Rajesh Khanna
“आम्ही अमिताभ बच्चन यांना आणून राजेश खन्नाचे करिअर…
navra maza navsacha 2 marathi actor Dhruva datar honest review
“चित्रपट खरंच खूप वाईट आहे” ‘नवरा माझा नवसाचा २’बद्दल मराठी अभिनेत्याचं स्पष्ट मत; म्हणाला, “सॉरी पण उगाच कौतुक…”
Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबाबत सरकारने जारी केला नवा जीआर; सुधारित शासन निर्णयातून कोणती घोषणा?
aimim imtiyaz Jaleel marathi news
Maharashtra News: एमआयएमचा महाविकास आघाडीला युतीबाबतचा शेवटचा प्रस्ताव; इम्तियाज जलील म्हणाले…
How peanuts can help in weight loss
शेंगदाणे वजन कमी करण्यात कशी मदत करू शकतात? कसे करावे सेवन? जाणून घ्या…
Man wrote message for his wife in back of the car video goes viral
किती ते प्रेम! नवऱ्यानं बायकोसाठी कारच्या मागे लिहला खास मेसेज; रस्त्यावर सर्व बघतच राहिले, VIDEO पाहून कराल कौतुक
Gang Rape in Nalasopara
Nalasopara Rape Case : बदलापूरनंतर आता नालासोपारा हादरले! तरुणीवर सामूहिक बलात्कार, पोलिसांनी तिघांच्याही मुसक्या आवळल्या!

१) लसूण

पालींना लसणाचा उग्र वास अजिबात आवडत नाही. अशा स्थितीत एक कप पाणी घेऊन, त्यात चार ते पाच लसूण पाकळ्या बारीक करून मिक्स करा. हे मिश्रण एका स्प्रे बाटलीत भरून चांगले हलवा आणि नंतर पाल दिसताच तिथे स्प्रे करा. अशाने पाल घरातून काही मिनिटांत पळून जाईल.

स्नायूंच्या मजबुतीसाठी अंड्याचा पांढरा भाग फायदेशीर; पण एका दिवसात व्यक्तीने त्याचे किती सेवन करावे? जाणून घ्या

२) अंड्याचे कवच

अंड्याच्या कवचांमधून येणारा वासही पालीला पळून लावण्यासाठी प्रभावी उपाय आहे. अंड्याचे कवच पाली ज्या ठिकाणी दिसतात, तिथे अडकून ठेवा. विशेषतः किचन टॉप आणि कॅबिनेटमध्ये तुम्ही अंड्याचे हे कवच ठेवू शकता. त्यामुळे किचनमधून तरी पालींना दूर करता येईल.

३) काळ्या मिरीचे पाणी

पालींवर काळ्या मिरीचे पाणी शिंपडल्यास त्यांचे डोळे जळू लागतात आणि मग त्या घाबरून पळून जातात. एका ग्लास पाण्यात थोडी ठेचलेली काळी मिरी पावडर घाला आणि हे पाणी पालींवर शिंपडा. त्याचा परिणाम दिसू लागेल. काळ्या मिरीव्यतिरिक्त लाल तिखट किंवा चिली फ्लेक्सदेखील वापरता येईल.

४) कॉफी पावडर

कॉफी पावडरनेही तुम्ही पालींना घरापासून दूर ठेवू शकता. त्यासाठी तंबाखू आणि कॉफी पावडर एकत्र करून, त्या मिश्रणाचे पाण्याच्या मदतीने छोटे छोटे गोळे बनवा. हे गोळे पाली ज्या ठिकाणी फिरताना दिसतात, तिथे ठेवा. पालीने हा गोळा खाल्ल्यावर ती तिथून पळून जाईल.