अनेकदा भांडी खूप दिवस वपारल्याने, तेलाचे डाग पडल्याने काळी पडतात. अशी जुनी भांडी स्वच्छ करताना त्रास होतो, कारण यावर असणारे डाग सहज निघणे शक्य नसते. असे चिकट आणि सहज न निघणारे डाग काढण्यासाठी काही सोपे उपाय मदत करतात. कोणते आहेत ते उपाय जाणून घ्या.
जुनी भांडी स्वच्छ करताना वापरा या सोप्या पद्धती:
आणखी वाचा: महिलांना होणाऱ्या या समस्या ठरू शकतात गंभीर आजाराचे कारण; वेळीच व्हा सावध
कांद्याचा रस आणि व्हिनेगर
कांद्याचा रस आणि व्हिनेगर वापरून ॲल्युमिनियम आणि स्टीलची भांडी स्वच्छ करण्यास मदत होते. यामुळे जुनी भांडी सहज स्वच्छ होऊन त्यांची चमक परत येण्यास मदत मिळते.
लिंबू आणि मीठ
लिंबू आणि मिठाचा वापर करून भांड्यांवरील काळे डाग सहज काढता येतात. यासाठी लिंबूवर थोडे मीठ टाकून, ते भांड्यावर काळे डाग असणाऱ्या जागी चोळा. नंतर आठवणीने साध्या पाण्याने ते भांडे धुवून घ्या. कारण लिंबू आणि मिठाने भांड्यावर पांढरा थर जमा होऊ शकतो.
आणखी वाचा: सुपरमार्केटमध्ये खिडक्या का नसतात? यामागचे कारण जाणून तुम्हीही व्हाल चकित
लिंबू आणि बेकिंग सोडा
कधीकधी भांडयांवर तेलकट थर जमा होतो, जो कितीही वेळा स्वच्छ केला तरी निघत नाही. यावर लिंबू आणि बेकिंग सोडा फायदेशीर ठरू शकते. लिंबू आणि बेकिंग सोडा अशा भांड्यावर चोळल्यास तेलकट थर काढण्यास मदत मिळेल.