How To Clean Pressure Cooker: आजकाल प्रेशर कुकर हा स्वयंपाक घराचा प्रमुख भाग बनला आहे. प्रेशर कुकर प्रत्येक घरात वापरला जातो, त्यात जेवणही कमी मिनिटात शिजते. ज्यामुळे आपल्याला इतरही कामं करायला वेळ मिळतो. प्रेशर कुकरमध्ये भात – डाळ दोन्ही गोष्टी शिजवता येते. स्वयंपाकघरात कुकरमध्ये अनेक गोष्टी शिजवल्या जातात. विशेषतः कडधान्ये कुकरमध्ये नेहमी शिट्टी लावून उकळतात. परंतु, काही वेळेस डाळ शिजवत असताना शिट्टीतून डाळ किंवा इतर मसाल्यांचे पाणी बाहेर येते. ज्यामुळे शिट्टी किंवा कुकरचं भांडं दोन्ही खराब होते.
प्रेशर कुकर वेळेवर साफ न केल्यास, हे डाग लवकर निघत नाही. ज्यामुळे प्रेशर कुकर साफ करणे देखील कठीण होऊन जाते. अशा स्थितीत प्रेशर कुकर हळू हळू पिवळट दिसू लागते. प्रेशर कुकर मेहनत न घेता स्वच्छ करायचं असेल तर, टिप्स फॉलो करून पाहा. काही मिनिटात प्रेशर कुकर क्लिन होईल.
टिश्यू पेपरची ट्रिक :
कुकरंच झाकण चकाचक ठेवायचं असेल तर त्यासाठी तुम्ही टिश्यू पेपरची एक ट्रिक फॉलो करु शकता. एक टिश्यू पेपर घ्या आणि त्याला मधोमध शिटी येईल अशा ठिकाणी छिद्र पडा. यानंतर तो कुकरच्या झाकणावर लावा. शिटीतून निघणारं पिवळं पाणी हे टिश्यू पेपर शोषून घेईल यामुळे तुमचं झाकणं खराब होणार नाही.
बेकिंग सोडा :
बेकिंग सोडाच्या मदतीने तुम्ही कुकर स्वच्छ करू शकता. कुकरवरचे हट्टी डाग काढण्यासाठी त्यावर बेकिंग सोडा आणि मीठ टाकावे. त्यानंतर स्पंजने हळूवारपणे डागांवर घासा. असे केल्याने कुकरचा पिवळसरपणा निघून जाईल, त्यानंतर तुम्ही कोणत्याही डिशवॉशने कुकर स्वच्छ करू शकता. डिशवॉशने साफ केल्यानंतर कुकर पाण्याने धुवा.
कांद्याची साल :
कांद्याची साल देखील तुमचा कुकर स्वच्छ करू शकते. कुकरमध्ये कांद्याची साल टाकून गरम करा नंतर कुकर डिशवॉश बारने धुवा. असे केल्याने तुमचा कुकर पुन्हा नव्यासारखा होईल.
हेही वाचा >> Kitchen Jugaad: मिक्सरवर कंगवे ठेवताच झाली कमाल! VIDEO पाहून डोळ्यांवर बसणार नाही विश्वास
सैंधव मीठ :
प्रेशर कुकर स्वच्छ करण्यासाठी आपण सेंधव मिठाचा वापर करू शकता. यासाठी कुकरमध्ये पाणी भरल्यानंतर त्यात एक चमचा सेंधव मीठ टाकून चांगले उकळा. यानंतर कुकर स्वच्छ पाण्याने धुवा. हा उपाय केल्याने कुकर पूर्णपणे स्वच्छ होईल.